MNS Melava: कल्याण-डोंबिवलीतून हजारो मनसैनिक शिवतीर्थावर दाखल; राज ठाकरेंना ऐकण्यासाठी उत्सुक

Shivtirtha MNS Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा नेते शिवसेने शिंदे गटाच्या नेत्यांची बैठका घेतल्यात मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केले नाही. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात? मनसे महायुती सहभागी होणार का राज ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
MNS Melava:  कल्याण-डोंबिवलीतून हजारो 
मनसैनिक शिवतीर्थावर दाखल; राज ठाकरेंना ऐकण्यासाठी उत्सुक

(अभिजीत देशमुख, कल्याण डोंबिवली)

MNS Melava Raj Thackeray Speech Shivtirtha:

नक्की काय घडलंय काय घडतय हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं 9 तारखेला शिवतीर्थावर या असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले. आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा असून या मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. कल्याण डोंबिवलीतमधून देखील सुमारे 200 ते 250 बसेस दादर शिवतीर्थावर आल्यात. (Latest News)

शेकडो कार्यकर्ते गाड्या आणि लोकल ट्रेन ने दादरला आलेत. गेल्या महिनाभरापासून राज्यभरात मनसे महायुतीत सहभागी होणार का याबाबत चर्चा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा नेते शिवसेने शिंदे गटाच्या नेत्यांची बैठका घेतल्यात मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केले नाही. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात ,मनसे महायुती सहभागी होणार का राज ठाकरे काय भूमिका घेणार? हे पाहावे लागेल.

300 पोलीस शिपाई सभेच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच 35 पोलीस अधिकारीसुद्धा सुरक्षेसाठी शिवाजी पार्क मैदानात आज असणार आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी एक विशेष पथक असणार आहे. मनसे कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कमध्ये येण्यास कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून मनसेचे 100 सुरक्षा रक्षक असणार आहेत. वाहतुकीसाठी मदत करणार आहेत. सभेच्या ठिकाणी 500 स्वयंसेवक आणि 100 वॉर्डनसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

आज मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय संबोधित करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई आणि उपगरातून हजारो मनसैनिक शिवतीर्थावर दाखल झालेत. मेळाव्याच्या टीझरमध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मेळाव्यात हजर राहण्याचे आवाहन केले होते. राज्यातील राजकरणाविषयी संवाद साधायचा आहे. त्यामुळे सर्व मनसैनिक राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. राज ठाकरे या आदेश देतात , काय भूमिका घेतात, त्याची उत्सुकता लागलीय.

MNS Melava:  कल्याण-डोंबिवलीतून हजारो 
मनसैनिक शिवतीर्थावर दाखल; राज ठाकरेंना ऐकण्यासाठी उत्सुक
Raj Thackeray: मनसेचा शिवाजी पार्कवर आज गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे काय बोलणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com