Raj Thackeray News : महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे. वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांता प्रकल्पावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'प्रचंड रोजगारनिर्मितीचा 'वेदांता ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे.
'वेदांता' ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात सत्तांतर होताच राज्याच्या हिताचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
सदर 'वेदांता' प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित करण्यात येणार आहे. 'वेदांता' ग्रुपचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत 'वेदांता' ग्रुपच्या प्रकल्पावर भाष्य केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, ' फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?'
राज ठाकरे पुढे म्हणाले, 'हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.