डोंबिवली - आज गोपाळकाला निमित्त डोंबिवली (Dombivli) आणि कल्याण (Kalyan) मध्ये विविध ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आल्या आहेत. डोंबिवलीत यंदा मोठ्याप्रमाणात दहीहंडी उभारल्या असून त्याची बॅनरबाजी ठिकठिकाणी करण्यात आली आहे. राज्यात नवीन सरकार आल्याने राज्यकीय परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे डोंबिवलीत यंदा मोठ्या प्रमाणावर दहीहंडी भरवण्यात आल्या आहेत. तर याची बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे.
हे देखील पाहा -
डोंबिवली पश्चिमेला शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांनी मध्यरात्री श्रीकृष्ण जयंती साजरी करत आज मोठी हंडी ठेवली आहे. तर भाजप तर्फे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दहीहंडी ठेवली आहे.
तर कॅबिनेट मंत्री यांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे मनसेने सुद्धा चार रस्त्यावर दहीहंडी ठेवली असून समाज माध्यमातून एक बॅनर व्हायरल केला आहे. त्या बॅनरच्या माध्यमातून मराठी माणसांसाठी, हिंदू संस्कृतीसाठी फक्त मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे बॅनरवर....
बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असून मराठी माणसांसाठी !! आपल्या हिंदू संस्कृतीसाठी !! राजसाहेब आहेत ना... असा संदेश देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.