बीड - जागतिक आदिवासी दिनादिवशी रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना बालहक्क कार्यकर्त्यांनी शासकीय बालगृहात दाखल केले. शिक्षणाच्या प्रवाहात आणून हातातील कटोऱ्या ऐवजी पेन देणं हा मूळ उद्देश होता. मात्र शासकीय बालगृहामधील कर्मचारी आणि अधिक्षक यांच्या अमानुष वागणुकीमुळे पुन्हा त्या मुलावर भीक मागायची वेळ आली. कर्मचारी आणि अधीक्षकाकडून अमानुष छळ करत मुलांना दारू पिऊन बेदम मारहाण करून उपाशी ठेवत होते.
बीड (Beed) शहरातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या आदिवासी पारधी समाजातील सहा मुलांना, बालहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय बालगृहात दाखल केलं. मात्र त्या ठिकाणचे कर्मचारी, केअर टेकर,आणि अधिक्षक यांनी या मुलांना मारहाण केली. धकादायक म्हणजे संडास बाथरूम, घासायला, भांडी घासायला,फरशी पुसायला लावलेले काम नाही केलं तर जेवण देत नव्हते, असं मुलांनी सांगितलं.
यामुळे आदिवासी पारधी समाजातील मुलांच्या बाबतीत प्रशासन एवढे निष्ठुर का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. आम्हला दारू पिऊन मारहाण केली. आठ दिवसापूर्वी आम्ही या बालगृहात आलो.इथं आल्यावर आम्हाला एक रूम दिली. सहा जण असताना त्यांनी चारच बेड दिले, गाद्या देखील फाटक्या होत्या.
हे देखील पाहा -
तरी आम्ही काही म्हणालो नाहीत. ते आम्हाला भांडे घासायला लावायचे, तसेच फरशी पुसायला लावायचे, बाथरूम देखील घासून स्वच्छ करायला लावले, आम्ही कामास नकार दिला तर जेवन देत नव्हते आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, एक दिवस तर दारू पिऊन येऊन एक जणानी आम्हाला मारहाण केली. अशी आपबीती आदिवासी मुलांनी सांगितली.
आम्हाला झाडू काढायला लावत होते. काम नाही केलं की खायला आम्हाला नाही म्हणत होते मारत होते.. एक दिवस तर आम्हाला खोलीमध्ये कोंडून दुसऱ्या मुलांना मटन खाऊ घातले, आम्हाला काहीच दिले नाही. अस देखील चिमुकल्याने सांगितलं
आमची मुलं शिकून मोठी होतील यासाठी आम्ही इथे आणून टाकली होती. मात्र इथे वेगळच पाहायला मिळालं, इथं आमच्या मुलाला मारहाण करतेत. फरशा पुसायला , झाडून काढायला लावत होते. फोन करून सारखे तुमच्या मुलांना तुम्ही घेऊन जा, नाहीतर मुलं दुसरीकडे कुठे गेले तर आम्हाला विचारू नका. असं देखील सांगत होते, असं महिला पालकांनी सांगितलं. मुलांना जास्त मारहाण झाली त्यामुळे मुलं शाळेचे नाव काढलं तरी भीत आहेत. मोठ्याची लेकरं शिकतात , मग आमची लेकरं जातील कुठे असा प्रश उपस्तिथ करण्यात येत आहे.
मुलं बालगृहात टाकल्यानंतर पाहण्यासाठी मी आलो होतो मात्र इथे सतत मारहाण करत आहेत असं मुलांनी सांगितलं. आम्हाला वाटत होतं की मुलांनी भीक न मागता शिकून मोठं व्हावं मात्र मारहाण एवढे मोठे प्रमाणात केली की मुलं इकडे यायचं म्हटलं तरी पळून जात आहेत. लेकरांना संडास बाथरूम घासायला लावत होते. मुलांना आणि आम्हालाही रागवून बोलत होते. प्रशासनाकडे एकच विनंती आहे की आदिवासी मुलांना शिकवण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी पालक शिवाजी पवार यांनी केली.
बीड शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या सहा मुलांना आम्ही संस्थेच्या वतीने बाल कल्याण समिती समोर सादर केलं त्यांनी जागतिक आदिवासी दिना दिवशी त्यांना शासकीय बालगृहात प्रवेशित करून घेतलं.. परंतु त्यानंतर आज आठ दिवसातच त्या मुलांना तिथून बाहेर काढून दिलं.. त्या मुलांना मारहाण झाली स्वच्छतागृह धुवायला लावले भांडी घासायला लावली झाडून काढायला लावलं अशी माहिती मिळाली हे अतिशय गंभीर आणि प्रकार आहे त्यामुळे नवीन सरकारने या प्रकारकडे लक्ष देऊन आदिवासींचे खेळताना थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी केले.
शासकीय बालगृहाचे अधीक्षक नितीन ताजनपुरे यांना विचारले असता मुलांना आम्ही स्वावलंबी व्हावे म्हणून त्यांची जेवण केलेली भांडी घासायला लावत होतो.. त्यांना मारहाण केली नसून लहान मुलांची आपापसात मारामारी सुरू व्हायची आणि त्यांच्यावर ते रागावल्यामुळे ते अशा पद्धतीने आरोप करत आहेत.. मुलांना नातेवाईकाची आठवण आल्यामुळे ते निघून गेले असे जबाबदार उत्तर बालगृहाच्या अधीक्षक नितीन ताजनपुरे यांनी दिला
तर या संदर्भात महिला बालकल्याणचे पर्यवेक्षक अधिकारी मंसुरी.ए. एन यांना विचारले असता मुलांना वातावरण सूट झाले नाही त्यांनी आपापसात भांडण केली आणि केअरटेकर रागावले असतील असे म्हणत सर्वे आरोप फेटाळले.
दरम्यान आदिवासी पारधी समाजाच्या मुलांना शासकीय बालगृहाच्या कर्मचारी व अधीक्षकाकडून अमानुष वागणूक व छळ सारख्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलांची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळं दुर्लक्षित घटकातील मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन मोठी स्वप्न बघायची की नाही ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.