Attention! राज्यात पहिला डबल डेकर पूल तयार होणार; वरुन मेट्रो, खालून वाहने!

Mumbai Metro on Double Decker Birdge: राज्यातील पहिला डबल डेकर पूल भाईंदर खाडीत तयार केला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे वसईतील मेट्रोचा मार्गही सुकर होईल.
मेट्रो
मेट्रोSaam Tv
Published On

Double-Decker Bridge : अटल सेतूनंतर महाराष्ट्राच्या विकासात आणखी एक सुवर्णपान जोडले जाणार आहे. कारण, राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार करण्यास पाण्यात देण्यात आली आहे. एकाच खांबावर मेट्रो ब्रीज आणि वानहनांसाठी ब्रीज तयार करण्यात येईल. असा प्रकराचा राज्यातील पहिलाच प्रयोग असेल. एमएमआरडीएकडून (Mumbai Metropolitan Region Development Authority) मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पहिला डबल डेकर पूल भाईंदर (bhayandar news) खाडीत तयार केला जाणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या निर्णयामुळे वसईतील मेट्रोचा मार्गही सुकर होईल. दोन्ही पूल एकाच मार्गातून असल्याने सरकारच्या तिजोरीवरील भार थोडा कमी होणार आहे.

मेट्रो
VIDEO : ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! लवकरच धावणार 'रिंग मेट्रो'

वसई शहरांमध्ये (vasai Metro) मेट्रो यावी याकरिता मेट्रोमार्ग 13 ची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. त्यावेळीच मीरा भाईंदर ते वसई विरार (Mumbai Metro) हा मेट्रोमार्ग एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मीरा रोड ते विरार हा 23 किलोमीटरचा मेट्रोमार्ग असून त्यामध्ये 20 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतचा संरचनात्मक आराखडा तयारीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

मेट्रो
Thane-Pune Metro: केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुणे-ठाण्यातील नव्या मेट्रो प्रोजेक्टला मंजुरी

MMRDA कडून भाईंदर - नायगावच्या मध्ये डबल डेकर ब्रीज तयार करण्यात येणार आहे. या ब्रीजवर 3+3 लेन असतील. हा डबल डेकर ब्रीज जवळपास ५ किमी लांब आणि 30.60 m रुंदी असेल. या डबल डेकर ब्रीजच्या वरच्या डेकवर मेट्रो रेल्वे आणि खालच्या डेकवर वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता असेल. हा राज्याच्या विकासाचा नवा अंक ठरेल. डबल डेकर ब्रीजमुळे वसई विभागातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

एकनाथ शिंदे यांनी यांनी 9 जुलै 2024 रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ते MMRDA चे अध्यक्ष देखील आहेत. या प्रकल्पावर सध्या काम सुरु आहे. याबाबतचा आरखडा सल्लागारांच्या मदतीने तयार करण्यात येत आहे.

मेट्रो
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! केंद्राने 'मेट्रो' प्रकल्पाला दाखवला हिरवा झेंडा, 12200 कोटींचा निधी मंजूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com