ईडीच्या मुंबई कार्यालयाने बारामती अॅग्रो कंपनीवर कारवाई केली. ईडीने या कारवाईत कंपनीची राज्यातील विविध भागातील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ५०.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचं बोललं जात आहे. ईडीच्या कारवाईवर बारामती अॅग्रो कंपनीचे व्यवस्थापाक, आमदार रोहित पवार यांनी 'एक्स' मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
ईडीने बारामती अॅग्रोवर कारवाई केल्यानंतर रोहित पवार म्हणाले, 'माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं… झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, असे ते म्हणाले.
'वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. लडेंगे जितेंगे, असे ते पुढे म्हणाले.
ईडीच्या मुंबई कार्यालयाने बारामती अॅग्रो कंपनीची मुंबई, कन्नड, छत्रपती संभाजीनगर येथील मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेत १६१.३० एकर जमीन, मशिनरी, साखर कारखान्याची इमारत जप्त केली. बारामती अॅग्रो कंपनीची ही एकूण ५०.२० कोटी किंमतीची मालमत्ता जप्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.