MLA Raju Patil : कोट्यवधीच्या पुलाच्या कामासाठी फक्त चार कामगार, MNS आमदार राजू पाटील संतापले

MLA Raju Patil News : कल्याण शीळ रोडवरील पलावा जंक्शन पूलाचे काम संथगतीने सुरू असून केवळ चार कामगार काम करत असल्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील कंत्राटदारावर चांगलेच
MLA Raju Patil
MLA Raju PatilSaam Digital
Published On

अभिजित देशमुख

कल्याण शीळ रोडवरील पलावा जंक्शन पूलाचे काम संथगतीने सुरू असल्याने कल्याण शीळ रोड वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या पुलांच्या कामाला गती मिळावी यासाठी आज मनसे आमदार राजू पाटील, एमएसआरडीसीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. पुलावर अवघे चार कामगार काम करत असल्याने आमदार राजू पाटील संतापले.

MLA Raju Patil
Thane Bus Service : ठाणेकरांचा प्रवास गारेगार होणार; डबल डेकर बसच्या सफारीचाही आनंद घेता येणार

कोट्यावधी पूलाच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत. हे काम होणार कसे? असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकार्‍यांकडे उपस्थित केला .त्यानंतर एम एस आर डी सी चे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी ठेकेदाराला दंड आकारत कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. आता या दौऱ्यानंतर तरी या पुलांची कामे जलदगतीने पूर्ण होतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

कल्याण शिळ रस्त्यावर एकीकडे सुरू असलेले मेट्रोचे काम तर दुसरीकडे संथगतीने सुरू असलेली पलावा जंक्शन पुलाचे काम यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे .या पुलाच्या कामांना गती मिळावी यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी एम एस आर डी सी चे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांच्यासह दोन्ही पूलांची पाहणी केली. यावेळी आमदार राजू पाटील यांनी पलावा उड्डाणपूल कामाआड येणाऱ्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली , हे बेकायदा बांधकाम लवकरच काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

MLA Raju Patil
Maharashtra Politics : विधानसभेसाठी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; विद्यमान आमदारांच्याही जागा धोक्यात? काय आहे कारण?

धक्कादायक म्हणजे पुलाच्या कामासाठी फक्त एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम करत असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी संताप व्यक्त केला .. यावेळी बोलताना आमदार राजू पाटील यांनी पत्री पूल, दिवा पूल यांच्यासह दोन्ही पुलांच्या कामात हलगर्जीपणा ,दिरंगाई केली जात असल्याने या पुलांची कामे रखडली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले .तर एम एस आर डी सी चे सहाय्यक संचालक जिंदाल यांनी देखील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत नाराजी व्यक्त करत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला खडे बोल सूनावले .कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही ,कामात जो विलंब होत आहे त्यासाठी तुम्हाला दंड आकारण्यात येईल अशी तंबी दिली . हे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे नाहीतर कारवाई करणार असा इशारा देखील दिला .

MLA Raju Patil
Ahmednagar Breaking : धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर डांबून ठेवलं, नेमक काय घडलं? VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com