MLA Disqualification Case : शिवसेना कुणाची? CM शिंदे, उद्धव ठाकरेंना विधीमंडळ पाठवणार नोटीस, कार्यवाहीला वेग

Political News in Maharashtra : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On

सूरज मसूरकर

Mumbai News :

शिवसेना फुटीनंतरच्या पेच प्रसंगानंतरची आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या सुनावणीला वेग आला आहे.

यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ नोटीस पाठवणार असल्याची माहिती विधीमंडळ विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. (Political News)

शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आल्याचं यातून दिसून येत आहे. दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. जुलै २०२२मध्ये नेमकी शिवसेनेची सूत्रे कोणाच्या हातात होती? हे तपासले जाणार असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Saamana Editorial : मोदी-शाहांचं नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही, 'सामना'तून घणाघात

दुसऱ्या सुनावणीत काय झालं?

याआधी २५ सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी विधानसभेत पार पडली. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी दोन्ही बाजूने आपला युक्तिवाद केला. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याची मागणी, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली होती. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Amol Kolhe News: पवार साहेबांची साथ सोडू नका, खासदार अमोल कोल्हेंना चिमुकल्याची साद; VIDEO व्हायरल

आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक

  • 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालणार युक्तिवाद

  • 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात होणार अंतिम सुनावणी

  • 13 ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल

  • 20 ऑक्टोबरला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही याचा निर्णय.

  • 13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल.

  • 20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.

  • याशिवाय 20 ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्र एखाद्या गटाला सादर करायची असतील, तर त्यासाठी संधी दिली जाईल.

  • 27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं (स्टेटमेंट) मांडतील.

  • 6 नोव्हेंबर पर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील.

  • 10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल.

  • 20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

  • 23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल.

  • सर्व पुरावे तपासल्या नंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com