Amol Kolhe News: पवार साहेबांची साथ सोडू नका, खासदार अमोल कोल्हेंना चिमुकल्याची साद; VIDEO व्हायरल

Amol Kolhe Video: चिमुकल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात "पवार साहेबांची साथ सोडू नका". असं सांगितलं.
satara news Don't leave Sharad Pawar saheb school boy talk MP Amol Kolhe Viral Video
satara news Don't leave Sharad Pawar saheb school boy talk MP Amol Kolhe Viral VideoSaam TV
Published On

Amol Kolhe Viral Video

उपमुख्यमंत्री अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. अनेक आमदारांनी अजित पवार यांना आपलं समर्थन दिलं आहे. तर काही आमदार आणि कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे देखील शरद पवार यांच्यासोबतच आहे. (Latest Marathi News)

satara news Don't leave Sharad Pawar saheb school boy talk MP Amol Kolhe Viral Video
Nanded News: तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्या; नांदेडच्या घटनेवरुन राष्ट्रवादी आक्रमक

सोमवारी अमोल कोल्हे एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी पारितोषिक वितरण समारंभादरम्यान एक चिमुकला त्यांच्याजवळ आला. पारितोषिक स्वीकारल्यानंतर या चिमुकल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात "पवार साहेबांची (Sharad Pawar) साथ सोडू नका". असं सांगितलं.

हर्षवर्धन पाटील असं अमोल कोल्हे यांना साद घालणाऱ्या चिमुकल्याचं नाव आहे. हर्षवर्धनच्या तोंडातून हे उद्गार ऐकल्यानंतर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) थक्क झाले होते. त्यांनी या चिमुकल्याचं तोंडभरून कौतुक केलं. या कार्यक्रमातील भाषणात हर्षवर्धनने सांगितलेल्या वाक्यांचा अमोल कोल्हे यांनी आवर्जून उल्लेख केला. उपस्थितांकडून देखील या चिमुकला हर्षवर्धन याचं कौतुक करण्यात आलं.

राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह कुणाला मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत येत्या ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आपली बाजू मांडणार आहेत. तर पक्षाच्या निकाल त्याचदिवशी आमच्या बाजूने लागेल, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून केला जात आहे.

पक्षावर दावा सिद्ध करण्यासाठी दोन तृतीयांश पाठिंबा दाखवावा लागतो, असा कायदा नाही. मला निवडणूक आयोगाचे समन्स आले आहे. ६ ऑक्टोबरला सुनावणीसाठी जाणार आहे, असं शरद पवार यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.

Edited by - Satish Daud

satara news Don't leave Sharad Pawar saheb school boy talk MP Amol Kolhe Viral Video
Saamana Editorial : मोदी-शाहांचं नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही, 'सामना'तून घणाघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com