
ठाण्यात एकाच रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या जखमा ताज्या असतानाच सोमवारी नांदेड जिल्ह्यात अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडली. शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. या घटनेनंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठली आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील या घटनेवर दुख: व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
"नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला गांभीर्याने न घेतल्यानेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अशाप्रकारच्या एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली. यातून सरकारी यंत्रणांचे अपयश स्पष्ट होते", अशी टीका शरद पवारांनी राज्य सरकारवर केली.
"किमान वेळीच या दुर्दैवी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि निष्पाप रुग्णांचा जीव वाचला जाईल यासाठी ठोस पावले उचलली जावीत याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे", असं म्हणत शरद पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे कान टोचले आहेत.
राज्य सरकारने नागरीकांच्या किमान हितासाठी काम करणे आवश्यक आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यूमुळे या सरकारला वेदना होत नसतील तर हि बेसिकातच गफलत म्हणावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.