Mira Road : मिरारोडच्या घटनेनंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर; पोलिसांचा फौजफाटा तैनात

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल; असे सांगितले होते.
Mira Road
Mira RoadSaam tv
Published On

मीरा रोड : मीरा रोड परिसरात झालेल्या घटनेनंतर आज शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नयानगरमधील अतिक्रमणावर जेसीबीच्या (Mira Road) माध्यमातून कारवाई करण्यात येत असून येथे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिसांचा (Police) फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

Mira Road
Bhandara News : शैक्षणिक मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम; दोन महिने राबविले जाणार अभियान

राज्याचे उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल; असे सांगितले होते. त्यानंतर मिरा रोडच्या नयानगर भागातील अतिक्रमणावर पालिका प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू याची काळजी घेतली जात आहे. याकरिता मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mira Road
Dhule News : बंद घराला आग; संसार उपयोगी वस्तूंसह रोकड जळून खाक

१ हजारपेक्षा जास्त पोलीस रस्त्यावर 

मिरारोड परिसरात होत असलेल्या कारवाई दरम्यान कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिडक्शन फोर्स, दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात आहे. यांच्यासह १ हजारपेक्षा अधिक पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com