Mira Road Case : धक्कादायक खुलासे; अनाथाश्रमात वाढलेल्या सरस्वतीच्या ३ बहिणी, सानेसोबत मंदिरात झालं होतं लग्न

Mira Road Case: सरस्वतीचं अहमदनगर कनेक्शन उघड झाल्यानंतर तिने सानेसोबत मंदिरात लग्न केल्याचंही समोर आलं आहे.
Mira Road Killing Case
Mira Road Killing CaseSaam Tv
Published On

Mira Road Case: मीरारोड येथील गीता नगरच्या सातव्या मजल्यावर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणीची निर्दयीपणे हत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बुधवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सरस्वतीचं अहमदनगर कनेक्शन उघड झाल्यानंतर तिने सानेसोबत मंदिरात लग्न केल्याचंही समोर आलं आहे. (Latest Marathi News)

मीरारोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणाचं अहमदनगर कनेक्शन देखील समोर आलं आहे. ३२ वर्षीय सरस्वती ही अनाथ होती. सरस्वतीने अहमदनगरमध्ये दहावीरपर्यंत शिक्षण घेतलं होतं. सरस्वती ही अहमदनगरमधील जानकी आपटे अनाथआश्रम या संस्थेत राहत होती.

तिने नोकरी शोधण्यासाठी मुंबईला चालल्याचे तिने अनाथआश्रम संस्थेला सांगितले होते. मात्र, अनाथआश्रमात वाढलेल्या सरस्वतीच्या हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला.

Mira Road Killing Case
Jalna Crime News: बायको गावाला गेली, नराधम जावयाने सासूवर केला अत्याचार; जालन्यातील संतापजनक घटना

याच मीरारोड येथील या हत्याकांड प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मृत सरस्वती वैद्य हिच्या तीन बहिणी देखील समोर आल्या आहेत. त्यांनी सरस्वती वैद्य हिच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी नयानगर पोलिसांकडे मागणी केली आहे.

याच प्रकरणात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात नवा खुलासा केला आहे. मीरा-भाईंदर, वसई पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज साने आणि सरस्वती वैद्य या दोघांनी एका मंदिरात लग्न केले होते. मात्र, वयाच्या गॅपमुळे लोकांच्या समोर वावरत नव्हते'.

महिला आयोगकडून दखल

मीरारोड येथील हत्याकांडाची दखल आता महिला आयोगाने देखील घेतली आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या सदस्य अॅड. गौरी छाबरीया आणि उत्कर्षां रूपवते यांनी नयानगर पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी त्यांनी आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

मीरारोडमध्ये नेमकं काय घडलं?

मीरा रोडच्या गीतानगरमध्ये राहणाऱ्या 56 वर्षांच्या मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर 32 वर्षीय सरस्वती वैद्यची क्रूर पद्धतीने हत्या केली. सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर क्रूर पद्धतीने झाड कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने बारीक बारीक तुकडे केले होते. यानंतर त्याने तिचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून कुत्र्याला देखील खायला घातल्याचा धक्कादायक प्रकार केला होता.

Mira Road Killing Case
Beed Crime News: धक्कादायक! शेतीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने मारहाण; गर्भवती महिलेसह ७ जण गंभीर जखमी

सानेच्या घरात नेमकं कसं दृश्य होतं?

सरस्वतीची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी मनोज सानेच्या घरातील बादल्या, टब, कुकर आणि कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे दिसले होते. या घटनेने पोलिसांना देखील हादरा बसला होता. शेजारच्या लोकांनी दुर्गंधीमुळे पोलिसांना तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.

दरम्यान, याप्रकरणी मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी आरोपी मनोज सानेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला मनोज सानेची १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com