Beed Crime News: धक्कादायक! शेतीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने मारहाण; गर्भवती महिलेसह ७ जण गंभीर जखमी

Parali Crime News: या मारहाणीत एकाच कुटुंबातील 3 षुरुष व 3 महिला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Parali Police Station
Parali Police Stationविनोद जिरे

Beed Nandagol Crime News: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या परळी तालुक्यात शेतीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Parali Police Station
Ratnagiri Sea : समुद्राचं पाणी एवढं कसं वाढलं? पाण्याचा रंगही बदलला; किनाऱ्यावरील होतं नव्हतं धुवून नेलं

याबाबत अधिक माहिती अशी की, शेताच्या वादातून डोळयात चटणी टाकून कोयत्याने मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार बीड (Beed) जिल्ह्यात घडला आहे. बीडच्या परळी (Parali) तालुक्यातील नंदागौळ गावात ही घटना घडली आहे. या मारहाणीत एकाच कुटुंबातील 3 षुरुष व 3 महिला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ही धक्कादायक घटना गेल्या 4 दिवसांपूर्वी घडली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सोमनाथ कदम , मोहर कदम, कृष्णा तुकाराम कदम व महादेव सुदाम कदम, लिंबाबाई मनोहर कदम, नरगेस महादेव कदम,मयुरी बाळु कदम अशी या जखमींची नावे आहेत.(Latest Marathi News)

Parali Police Station
Nandurbar News: आमदार आले दारी; अक्कलकुवा तालुक्यातील जनतेने मांडले गाऱ्हाणी

यामध्ये एका गर्भवती महिलेलाही बेदम मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेतील सर्व जखमींवर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चाळीसगाव तालुक्यात खळबळ....

दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातही दोन भीषण हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. चाळीसगाव तालुक्यातील जामडी व चिंचखेडे शिवारात वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून (Crime News) झाला. जामडी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा तर चिंचखेडे येथे एका शेतकऱ्याचा लाकडी दांड्याने हल्ला करून व गळा आवळून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे तालुका हादरला असून, वेगवेगळ्या पोलिस (Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com