Mira Bhayandar News: कामावरून घरी आला अन् झोपला, नंतर घडलं भयंकर; पोलिस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ

Police Constable End Life At Mira Bhayandar: मिरा-भाईंदर येथे राहणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलचा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mira Bhayandar News: कामावरून घरी आला अन्  झोपला, नंतर घडलं भयंकर; पोलिस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ
Police Constable End Life At Mira BhayandarSaam Tv
Published On

महेंद्र वानखेडे, मिरा-भाईंदर

मिरा भाईंदरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कॉन्स्टेबलने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. राहत्या घरीच पंख्याला गळफास घेऊन या पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळावर पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. या घटनेचा तपास मिरारोडच्या काशीगाव पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार पोलिस आयुक्तालयामध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली. सागर अथनीकर असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सध्या या पोलिस कॉन्स्टेबलची नेमणूक कंट्रोल रूमला करण्यात आली होती. मिरारोडमधील अपना घर फेस या संकुलात राहत्या घरी गळफास घेऊन सागर अथनीकरने आत्महत्या केली.

सागर आणि त्याचा एक सहकारी पोलिस एकत्र राहत होते. सायंकाळी ७.३० च्या सुमारास सागर रूममध्ये झोपला होता. त्याला बघण्यासाठी गेले असता त्याच्या सहकारी पोलिस मित्राला सागर पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सागरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्यासोबत राहणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलने तात्काळ काशीगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Mira Bhayandar News: कामावरून घरी आला अन्  झोपला, नंतर घडलं भयंकर; पोलिस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ
Mumbai Fire News : मोठी बातमी! माहिममधील रहिवासी इमारतीला भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट

काशीगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सागरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. सागर राहत असलेल्या घरामध्ये सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. सागरच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली आहे. काशीगाव पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली असून पुढील तपास करत आहेत.

Mira Bhayandar News: कामावरून घरी आला अन्  झोपला, नंतर घडलं भयंकर; पोलिस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने खळबळ
Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com