MHADA : म्हाडाच्या जागेवर ६० होर्डिंग अनधिकृत; केवळ दोन होर्डिंगलाच एनओसी

MHADA News : घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १७ जणांनी प्राण गमावले आहेत. म्हाडाने आपल्या जागेवर असलेल्या होर्डिंगचा शोध घेतला असून ६२ पैकी ६० होर्डिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे.
MHADA
MHADASaam Digital

घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १७ जणांनी प्राण गमावल्यानंतर मुंबईतील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्याची दखल घेत म्हाडाने आपल्या जागेवर असलेल्या होर्डिंगचा शोध घेतला असून ६२ पैकी ६० होर्डिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे. संबंधितांनी पालिकेकडून होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी घेतली असली तर जागा मालक म्हणून एनओसी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यावर कारवाईचा बडगा उभारण्याची म्हाडाने तयारी सुरू केली आहे.

मुंबई शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहीराती करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून हायवे शेजारी, इमारतींवर होर्डिंग उभारण्यास पालिकेकडून परवानगी दिली जाते. मात्र मुंबईत बहुतांश ठिकाणी म्हाडाचे भूखंड आणि इमारती आहेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणी होर्डिंग उभारण्यासाठी पालिकेकडून परवानगी घेतानाच म्हाडाची एनओसी घेणे बंधनकारक आहे.

मात्र म्हाडाने केलेल्या तपासणीत त्यांच्या जागेवर ६२ होर्डिंग असल्याचे अढळून आली आहेत. त्यापैकी केवळ दोन होर्डिंगलाच म्हाडाने एनओसी दिली आहे. उर्वरित होर्डिंग बेकायदेशीर ठरत असल्याने त्यांची परवानगी रद्द करावी असे पत्र पालिकेला दिल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

MHADA
Mega Block : ‘जम्बो ब्लॉक’चा लाखो प्रवाशांना फटका; सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीची द्यावी लागली परवानगी

भाडे आणि व्याज वसूल केले जाईल

म्हाडाची एनओसी न घेता होर्डिंग उभारणे किंवा बांधकाम करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्या होर्डिंगला एनओसी नाही ती संबंधितांनी तत्काळ काढावीत अन्यथा आम्ही ती तोडून काढून आणि त्याचा खर्च वसूल करू असं म्हाडाने म्हटले आहे. तसेच बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या होर्डिंगच्या माध्यमातून म्हाडाला कोणतेही भाडे किंवा महसूल मिळत नाही. त्यामुळे होर्डिंग उभारल्यापासूनचे भाडे आणि त्यावरील व्याज असे दोन्ही वसूल केले जाईल असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

MHADA
Mumbai Fire : आग लागताच कामगार पळत सुटले; ताडदेवच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com