Mega Block on Western Railway : पश्चिम रेल्वच्या सफाळे ते केळवेरोड स्थानकादरम्यान आज मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द

Mega Block News : कपासे येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
mumbai mega block
mumbai mega block Saam Tv News

Palghar News : पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात आज म्हणजे 21 जून रोजी सकाळी 9 ते 10.40 वाजेच्या दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. कपासे येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने रेल्वेतर्फे मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे‌ अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे सफाळे रेल्वे प्रशासनाने सांगितले. पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकातील सकाळच्या सुमारास अप मार्गावरील 9.05 ची बोईसर-वसईरोड, 9.24 ला येणारी बोरिवली लोकल रद्द करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

mumbai mega block
Mumbai News: हसतोय नालायक म्हणत आमदार गीता जैन यांनी अभियंत्याच्या कानशिलात लगावली, व्हिडिओ व्हायरल

लोकल केळवेरोड स्थानकापर्यंत येऊन पुन्हा डहाणूरोडकडे जाणार आहे. 9.38 ची सूरत-विरार शटल पालघरपर्यंत येणार असून पालघरून पुन्हा वलसाडकडे रवाना होणार आहे. 10.24 ची डहाणू रोड ते विरार रद्द करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

mumbai mega block
PM Modi-Elon Musk Meeting : 'मी मोदींचा फॅन...', मस्क यांच्याकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक; जॅक डोर्सींचा दावाही फेटाळला

या मेगाब्लॉक दरम्यान विरारकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डाउन मार्गावरील 7.38 डोंबिवली-बोईसर, 9.18 आणि 10.24ची चर्चगेट -डहाणू, 11.45 ची विरार वलसाड या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com