PM Modi-Elon Musk Meeting : 'मी मोदींचा फॅन...', मस्क यांच्याकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक; जॅक डोर्सींचा दावाही फेटाळला

PM Modi-Elon Musk News : या वर्षाच्या अखेरीस भारतात टेस्लासाठी जागा निश्चित करतील, असंही मस्क यांनी सांगितलं.
PM Modi-Elon Musk Meeting
PM Modi-Elon Musk Meeting Saam TV
Published On

PM Modi In America : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या  अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींनी टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली. यावेळी इलॉन मस्क यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॅन असल्याचंही मस्क यांनी म्हटलं.

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भेटीनंतर इलॉन मस्क यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरोखरच भारताची खूप काळजी आहे आणि ते टेस्लाला देशात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास आग्रह करत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून मला खूप आनंद झाला.

मोदी सतत भारताचा विचार करतात

मस्क पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना खरोखरच भारतासाठी योग्य गोष्टी करायच्या आहेत. पंतप्रधान खुल्या मनाचे आहेत. ते नेहमी नवीन कंपन्यांना पाठिंबा देतात. कंपन्यांचा भारताला कसा फायदा होईल याचा ते सतत विचार करत असतात.

PM Modi-Elon Musk Meeting
Saamana Editorial : 'बदनामीचे शिंतोडे टाळण्यासाठी सीमेवरील सत्य लपवले...'; भारत चीन तणावामुळे सामनातून PM मोदींवर हल्लाबोल

यावर्षी भारतात टेस्लासाठी जागा निश्चित होईल

मी पुढच्या वर्षी पुन्हा भारताला भेट देण्याचा विचार करत आहे. मला आशा आहे की आम्ही लवकरच भारतातही Starlink लाँच करू. स्टारलिंक इंटरनेट भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना मदत करेल. या वर्षाच्या अखेरीस भारतात टेस्लासाठी जागा निश्चित करतील, असंही त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

मस्क यांनी 2015 मध्ये मोदींसोबतच्या पहिल्या भेटीच्या आठवणींनाही उजाळा दिला. काही वर्षांपूर्वी टेस्लाच्या प्लांटमध्ये पंतप्रधान मोदी आले, तिथे आम्ही भेटलो होतो, असं म्स्क यांनी सांगितलं.

PM Modi-Elon Musk Meeting
Mandatory AC Cabins in Trucks: ट्रकचालकांसाठी आनंदाची बातमी, लवकरच केबिनमध्ये AC अनिवार्य; नितीन गडकरींची मोठी घोषणा

जॅक डोर्सींचा दावा फेटाळला

आज तकच्या वृत्तानुसार, ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या दाव्यावर मस्क यांनी मोठा खुलासा केला आहे. स्थानिक सरकारच्या नियमांचं पालन करण्याशिवाय ट्विटरला पर्याय नाही. आम्ही स्थानिक सरकारच्या कायद्यांचे पालन केले नाही तर आमच्यावर बंदी येईल. आपण अमेरिकेचे नियम संपूर्ण जगाला लागू करू शकत नाही, असं मस्क यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com