Mega Block
Mega BlockSaam Digital

Mega Block : मध्य रेल्वेच्या विनंतीनंतरही पश्चिम रेल्वेवर दिवसा मेगाब्लॉक; आता तिन्ही मार्गावर होणार प्रवाशांचे हाल !

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेला शनिवारी-रविवारी ब्लॉक न घेण्याची विनंती केली होती. मात्र, पश्चिम रेल्वेने विनंती फेटाळत रविवारी दिवसा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर सुद्धा प्रवाशांचे हाल होणार आहेत.

ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच-सहाची रुंदी वाढविण्यासाठी आणि सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दहा -अकराच्या लांबी वाढविण्याकरिता सलग तीन दोन दिवस मेगाब्लॉक घेतला आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेला शनिवारी-रविवारी ब्लॉक न घेण्याची विनंती केली होती. मात्र, पश्चिम रेल्वेने विनंती फेटाळत रविवारी दिवसा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर सुद्धा प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेने मुंबई विभागाने ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच-सहाची रुंदी वाढविण्यासाठी शुक्रवारी रात्री १२.३० ते रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यत तब्बल ६३ तासांचा ब्लॉक घेतला आहे. त्याच सोबत सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दहा -अकराच्या लांबी वाढविण्याकरिता शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यत असे ६३ तासांचा ब्लॉक घेतला आहे. या दोन्ही ब्लॉकमुळे ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने शासकीय आणि खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन केले होते. याशिवाय पश्चिम रेल्वेला सुद्धा शनिवारी-रविवारी ब्लॉक न घेण्याची विनंती केली होती. परंतु, पश्चिम रेल्वेने रविवारी दिवस ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. हा ब्लॉक मुंबई सेंट्रल ते चर्चगेट जलद मार्गावर असणार आहे.

Mega Block
Mega Block : ‘जम्बो ब्लॉक’चा लाखो प्रवाशांना फटका; सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीची द्यावी लागली परवानगी

रविवारी पश्चिम रेल्वेवर- ब्लॉक

पश्चिम रेल्वेने रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि सिग्नलिंग, ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप- डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत असणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात येत आहे.

Mega Block
Mumbai Fire : आग लागताच कामगार पळत सुटले; ताडदेवच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com