'त्यांना सांगावं लागतं मी भाजपचा आहे' महापौर किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंना टोला (पहा व्हिडीओ)

'नितेश राणेंना कोणत्यातरी प्रकरणावरती आवाज उठवून विरोधक म्हणून, तसेच त्यांना भाजप पक्षाचा निष्ठावान आहे असं दाखवाव लागतं'
'त्यांना सांगावं लागतं मी भाजपचा आहे' महापौर किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंना टोला (पहा व्हिडीओ)
'त्यांना सांगावं लागतं मी भाजपचा आहे' महापौर किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंना टोला (पहा व्हिडीओ)SaamTV

मंबई : आज आमदार नितेश राणेNitesh Rane यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुलुंड क्रीडा संकुल Mulund Sports Complex आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल मधील स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्टचा खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे आणि हे खासगीकरण महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय होणं अशक्य आहे असा उल्लेख त्यांनी पत्रामध्ये केला आहे.

दरम्यान या प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना महापौर Mayor किशोरी पेडणेकर Kishori Pedanekar यांनी 'नितेश राणेंना कोणत्यातरी प्रकरणावरती आवाज उठवून विरोधक म्हणून तसेच आपण भाजप पक्षाचे BJP Party निष्ठावान आहे असं दाखवाव लागतं' असा टोला लगावला आहे. तसेच या प्रकणाची मला संपुर्ण माहिती नाही, मी अजून माहिती घेतली नाही मी सर्व माहिती घेईन आणि जे काही असेल ते सर्वांसमोर येवून सांगेन, तसेच आम्ही जे काही करतो ते मुंबईच्या नागरिकांच्या हिताचेच करतो असंही त्या यावेळी म्हणाल्या. Mayor Kishori Pednekar criticizes Nitesh Rane

पहा व्हिडीओ-

काय आहे प्रकरण

'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’च्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. तसेच सध्या या संकुलाचा कारभारावरती महापालीकेचे नियंत्रण आहे या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हे महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतात.

'त्यांना सांगावं लागतं मी भाजपचा आहे' महापौर किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंना टोला (पहा व्हिडीओ)
मुंबईमधील तलावांच्या खासगीकरणाचा घाट कशासाठी; नितेश राणेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र!

मात्र आता या प्रतिष्ठानवरती नवीन विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्र कुमार जैन नियुक्त करण्यात आली आहे . जैन यांची नियुक्ती केल्यावरती लगेचच स्विमिंग पुल आणि बॅटमिंटन कोर्टच्या 'खासगीकरणाचा' घाट का घातला जात आहे असा सवाल उपस्थित करतानाच नितेश राणे यांनी देवेंद्र कुमार जैन हे महापौर किशोरी पेडणेकर यांचेही ओएसडी आहेत त्यामुळे महापौरांच्या सांगण्यावरुनच हे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे का? आणि ते कोणाला द्यायच हे पण ठरलं आहे अशा चर्चा होत आहेत असे अनेक आरोप नितेश राणें यांनी महापौरांवरती मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रामधून केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com