मुंबई : आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांना पत्र लिहले आहे मुलुंडMulund क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसलेShahajiraje BHosale क्रीडा संकुल मधील स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्टचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे आणि या खासगीकरणामुळे जवळपास 1000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना उध्वस्त केलं जाण्याची भीतीही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. Nitesh Rane's letter to the Chief Minister
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीBalasaheb Thackeray मुंबई फक्त धन दांडग्यांची न राहता येथील सामान्य मुंबईकरांनाही खेळ मैदानं, जलतरण तलावSwimming pool उद्यानं पाहायला मिळावीत, त्याचा लाभ घेता यावा, तिथं आपली कौशल्य विकसीत करता यावीत यासाठी त्यांनी 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ ची स्थापना केली होती मात्र बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानालाच भ्रष्टाचाराचं केंद्र करण्यात येतंय! असा संताप सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत असा मजकूर नितेश राणेंनी आपल्या पत्रामध्ये लिहला आहे.
तसेच 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’च्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा sports complex कारभार आहे. तसेच या प्रतिष्ठानामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी यावर महापालीकेचे नियंत्रण असावे असे बाळासाहेबांना वाटले होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हे महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली हाती मात्र आता प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) OSD देवेंद्र कुमार जैनDevendra Kumar Jain नियुक्त झाल्यावरती लगेचच स्विमिंग पुल आणि बॅटमिंटन कोर्ट यांच्या 'खासगीकरणाचा' घाट घातला आहे. आणि यातील विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. म्हणजेच महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही असा आरोप नितेश राणेंनी महापौर किशोरी पेडणेकरांवरMayor Kishori Pednekar केला आहे.
तसेच जैन हे कुणाच्या निर्देशावरून सामान्य मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅटमिंटन कोर्ट 'विकायला' निघाले आहेत. आणि तो कुणाच्या घशात घालायचे आहेत हेही अगोदरच ठरले असल्याच्या गरम वार्ता क्रिडा वर्तुळात चांगल्याच फिरत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान अभिरूची स्वारस्य अर्ज फक्त दिखावा आहे. एकदा याचं खासगीकरण झालं की यात काम करणाऱ्या १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना उद्धवस्त केले जाणार हे स्पष्ट असून त्या कर्मचाऱ्यांमध्ये अर्धे शिवसैनिकच आहेत असही राणें यांनी आपल्या पत्रामध्ये लिहलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.