Kishor Aware News:किशोर आवारे हत्या प्रकरणात आमदार सुनील शेळकेंचे नाव; कुटूंबियांच्या आरोपाने खळबळ

Maval Crime News Update: पुण्यातील मावळमध्ये भर दिवसा मुळशी पॅटर्नचा थरा पाहण्यास मिळाला, ज्यामुळे संपूर्ण तालुका हादरुन गेला आहे...
Sunil Shelke News
Sunil Shelke NewsSaam tv

Kishor Aware Death Case Update: पुण्यातील मावळमध्ये भर दिवसा मुळशी पॅटर्नचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. मावळमधील तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरुन गेला आहे.

या हत्ये प्रकरणी सध्या एक महत्वाची बातमी समोर येत असून किशोर आवारे यांच्या कुटूंबियांनी आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावावर किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

Sunil Shelke News
Cyber Crime: सावधान! माजी पोलीस आयुक्तांच्या नावे मॅसेज आल्यास काळजी घ्या; हेमंत नगराळेंनी दिली धक्कादायक माहिती

याबाबत अधिक माहिती अशी की, मावळमध्ये (Maval) जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा काल निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर पोलिस तपास करत असून रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्याच काम सुरू होते. (Latest Marathi News)

या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत असून राष्ट्रवादीचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी या हत्येचा कट रचल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या कुटूंबियांनी केला आहे. याबाबत किशोर आवारे यांची आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sunil Shelke News
Jalna Crime News: नवरा-बायकोच्या वादाचा भयानक अंत! पत्नीची हत्या करून पतीने घेतला गळफास; तीन मुलं झाली पोरकी

या फिर्यादीनुसार किशोर आवारे हत्येप्रकरणी श्याम निगडकर व त्यांचे तीन साथीदार यांच्यासह मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Pune News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com