Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! अंधेरीमध्ये ४ मजली इमारतीला भीषण आग, २ तरुणांचा होरपळून मृत्यू

Andheri Company Fire: अंधेरी पूर्वच्या चांदीवली परिसरात एका ४ मजली इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीमध्ये असलेल्या कंपनीत आग लागली. या आगीत होरपळून २ तरुणांचा मृत्यू झाला. ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! अंधेरीमध्ये ४ मजली इमारतीला भीषण आग, २ तरुणांचा होरपळून मृत्यू
Mumbai FireSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईतील चांदिवलीमध्ये व्यावसायिक इमारतीला भीषण आग

  • ४ मजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर आग

  • आगित होरपळून दोन तरुणांचा मृत्यू

  • ३ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश

मुंबईतील चांदिवली परिसरात इमारतीला भीषण आग लागली. बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एका व्यावसायिक इमारतीत भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून दोन तरुणांचा मृत्यू झाला. आग भीषण असल्यामुळे संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. ३ तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने ही आग विझवली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वच्या चांदिवली परिसरातील साकी विहार रोडवरील नारायण प्लाझा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका कारखान्याला भीषण आग लागली. बुधवारी संध्याकाळी ६.३६ वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आी. या आगीमुळे ४ मजली इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! अंधेरीमध्ये ४ मजली इमारतीला भीषण आग, २ तरुणांचा होरपळून मृत्यू
Mumbai Fire : अंधेरीच्या आगीत ४५ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू, २ जणांची प्रकृती गंभीर

मेसर्स निओसेल इंडस्ट्रीज (युनिट क्रमांक ३०३) येथील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आग संपूर्ण मजल्यावर वेगाने पसरत गेली आणि क्षणात सगळीकडे धूराचे लोट पसरले. बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांना कार्यालयात दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! अंधेरीमध्ये ४ मजली इमारतीला भीषण आग, २ तरुणांचा होरपळून मृत्यू
Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर

भगवान पितळे (३० वर्षे) या तरुणाला सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले. तर सुमंत जाधव (२८ वर्षे) या तरुणाला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या आगीत कारखान्यातील इलेक्ट्रिकल वायरिंग, फर्निचर, लिथियम-आयन बॅटरी, ऑफिसच्या फाईल्स, लाकडी पार्टीशन आणि फॉल्स सीलिंग पूर्णपणे जळून खाक झाले.आग आटोक्यात आल्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू केले जे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आगीचे कारण सध्या शोधले जात आहे. पण ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! अंधेरीमध्ये ४ मजली इमारतीला भीषण आग, २ तरुणांचा होरपळून मृत्यू
Bunty Jahagirdar Firing Case: श्रीरामपूर हादरलं! जंगली महाराज बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागिरदारची हत्या; हल्ल्याचा CCTV व्हिडिओ Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com