Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

V S Gaitonde: मराठी चित्रकार व्ही एस गायतोंडे यांची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. त्यांचे एक पेन्टिंग तब्बल ६७ कोटी रुपयांना विकले गेले. या पेंन्टिंगमध्ये दडलय काय ते वाचा...
Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...
Painter V S GaitondeSaam Tv
Published On

Summary Pointers in Marathi

  • वासुदेव गायतोंडे यांच्या पेंटिंगची 67 कोटींना विक्री झाली.

  • भारतीय अमूर्त कलेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली.

  • सॅफ्रनआर्टच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त लिलाव झाला.

  • हुसेन यांच्यानंतर गायतोंडे भारतीय कलेतील सर्वाधिक महाग कलाकार ठरले.

शामल भंडारे, साम टीव्ही

एका मराठी चित्रकाराचं पेंटींग तब्बल 67 कोटींना विकलं गेलंय. शीर्षक नसलेलं हे पेंटींग कोणी रेखाटलं आहे ? एव्हढी विक्रमी किंमत या चित्राला का मिळाली आहे? पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून...

हे चित्र पाहा. हे काही साधसुध चित्र नाही. अत्यंत महागडं चित्र आहे. त्याची किंमत एक दोन नव्हे तर तब्बल 150 मर्सिडीज येतील एवढी आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण होय. विशेष म्हणचे एका मराठी चित्रकाराने काढलेलं हे पेन्टिंग तब्बल 67 कोटींना विकलं गेलंय. हे पेन्टिंग आहे ऑईल कॅनव्हास या प्रकारातलं आणि ते रेखाटलंय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार व्ही एस गायतोंडे यांनी. खरंतर गायतोंडेंच्या पेन्टिंगला एवढी विक्रमी किंमत मिळण्यामागे नेमका काय अर्थ दडलाय? त्याविषयी कलेच्या जाणकारांनी माहिती दिलीय. यांच्या एका ब्रशच्या स्ट्रोकची किंमत कोट्यवधी आहे. त्या गोयतोंडेंची माहिती पाहूयात...

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...
Mumbai Local: धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला लागला, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वासुदेव गायतोंडे यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1924 रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. मुंबईत जे. जे. स्कूलमध्ये शिक्षण घेऊन गिरगावमध्ये ते वास्तव्याला होते. गायतोंडे हे भारतीय अमूर्त कलांचे प्रणेते मानले जातात. सर्वात एकांतवासी चित्रकारांपैकी एक मानले जाणारे गायतोंडे यांनी अमृता शेर-गिल यांच्या 'द स्टोरी टेलर' आणि तैयब मेहता यांच्या 'ट्रस्टेड बुल' ला मागे टाकले. त्यांनी त्यांच्या कलेचे वर्णन "निरपेक्ष" असे केले. जे झेन तत्वज्ञान आणि प्राचीन लिपीतून प्रेरणा घेत होते. १० ऑगस्ट २००१ रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...
Mumbai To Pune Travel: मुंबई ते पुणे कसा कराल झटपट प्रवास; रेल्वे, बस, विमानसेवा की खाजगी वाहने, काय ठरेल बेस्ट

शनिवारी दिल्लीत सॅफ्रनआर्टच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या लाईव्ह इव्हिनिंग सेलमध्ये या ऑइल ऑन कॅनव्हास कलाकृतीचा लिलाव करण्यात आला. हे साधं दिसणाऱ्या पेन्टिंगला दिल्लीतील कला लिलावात ऐतिहासिकरित्या 67 कोटी 8 लाख इतकी विक्रमी किंमत मिळालीय. याआधी विक्रमी किंमत मिळालेली भारतीय पेन्टिंग कुणाचे आहेत? पाहूयात.

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...
Navi Mumbai Airport : मोठी बातमी! ८ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता | VIDEO

एम.एफ. हुसेन यांचे प्रसिद्ध पेंटिंग, "ग्राम यात्रा" हे 118 कोटीला विकले गेले. जे सध्या भारतातील सर्वात महागडं पेन्टिंग ठरलंय. तर दुसऱ्या क्रमांकावर गायतोंडे यांचं 67 कोटींना विकलं गेलेलं पेन्टिंग आहे. एवढंच नाही तर गायतोंडेंचं आणखी एक पेन्टिंग या अगोदर 2021 साली तब्बल 42 कोटींना विकलं गेलंय. हयातीत गायतोंडेंनी अनेक हालअपेष्टा सहन करत कलेची निस्सीम सेवा केली. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कलेला मिळत असलेली प्रसिद्धी आणि पैसा हा त्यांच्या हयातीत त्यांना मिळाला असत तर तेव्हाच या अवलीया कलाकाराला खरी दाद मिळाली असती.

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...
Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com