मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Demand For Marathi Mayor In Mira Bhayandar: मीरा-भाईंदर महानगरपालिकेत पुन्हा गुजराती महापौर निश्चित मानले जात असून मराठी महापौरच्या मागणीवरून मनसे आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे.
Political tension escalates in Mira-Bhayandar over the mayoral appointment issue.
Political tension escalates in Mira-Bhayandar over the mayoral appointment issue.Saam Tv
Published On
Summary
  • मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा गुजराती महापौर निश्चित होण्याची शक्यता

  • मराठी महापौरच्या मागणीवरून मनसे व मराठी एकीकरण समिती आक्रमक

  • भाजपकडून डिंपल मेहता यांचे नामनिर्देशन

  • ३ तारखेला उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

  • यापूर्वीही मराठी विरुद्ध अमराठी वादामुळे शहर तापले होते

मीरा भाईंदर महानगर पालिकेवर पुन्हा गुजराती महापौर होण्यावरून मराठी एकीकरण समिती आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतली आहे. यातच भाजपने पालिकेवर महापौर बसवण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

मराठी एकीकरण समितीकडून मराठी महापौर द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा ठाम इशारा दिला होता. मात्र भाजपाकडून महापौरपदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याने मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा गुजराती महापौर विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.

Political tension escalates in Mira-Bhayandar over the mayoral appointment issue.
राजकारणाचा विचका झालाय; राष्ट्रवादीचा अध्यक्ष 'पाटील' असावा, पटेल नाही, सुनेत्रा पवारांनी शपथ घेताच राज ठाकरेंची पोस्ट

३ तारखेला नेताजी सुभाष चंद्रबोस चौक ते मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाही सहभाग असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Political tension escalates in Mira-Bhayandar over the mayoral appointment issue.
अर्थशास्त्रात पदवीधर ते ४ विशेष कलागुणांमध्ये पारंगत; राजकारणाच्या पलिकडल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जाणून घ्या

काही महिन्यांपूर्वीच मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी हा वाद उफाळून आला होता. एका परप्रांतीयाला मनसे सैनिकांकडून मराठी भाषेवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मोठा राडा झाला होता. त्यानंतर त्याच ठिकाणी राज ठाकरे यांनी जोरदार भाषण ही केले होते. यानंतर आता भाजपने महापालिकेवर अमराठी महापौर दिल्याने मोठा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com