सैन्यामध्ये अधिकारी असल्याचे सांगत भरतीच्या नावाखाली अनेकांना गंडा

समोरच्यावर छाप पडावी यासाठी त्याने सैन्याचे अनेक आर्मी-मिल्ट्रीचे युनिफॉर्म वापरायचा. एवढच नाही तर रिवॉल्वरही जवळ बाळगायचा.
सैन्यामध्ये अधिकारी असल्याचे सांगत भरतीच्या नावाखाली अनेकांना गंडा
सैन्यामध्ये अधिकारी असल्याचे सांगत भरतीच्या नावाखाली अनेकांना गंडाSaam TV
Published On: 

पुणे: सैन्यामधे अधिकारी असल्याचे भासवून तरुणांकडून सैन्य भरतीच्या नावाखाली पैसै उकळणाऱ्या एका तोतयाला मिलिट्री ऑफिसरला पुण्यातील आर्मी इंटेलिजन्स अर्थात सैन्याच्या गुप्तचर विभागाने अहमदनगरमधे अटक केली आहे. नवनाथ सावळेराम गुलदागड असे या तोतया सैन्य अधिकाऱ्याचे नाव असुन तो मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmadnagar District) राहूरीचा रहिवासी आहे. नवनाथ गुलदागड हा सैन्यात भरती होण्याची इच्छा असलेल्या तरुणांना तो सैन्यात कधी सुभेदार असल्याच सांगायचा, कधी कॅप्टन असल्याच सांगायचा तर कधी कर्नल असल्याच सांगायचा.

समोरच्यावर छाप पडावी यासाठी त्याने सैन्याचे अनेक आर्मी-मिल्ट्रीचे युनिफॉर्म वापरायचा. एवढच नाही तर रिवॉल्वरही जवळ बाळगायचा. याच तोतयेगीरीचा वापर करुन त्याने अनेक तरुणांकडून सैन्यात भरती करून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले. एवढच नाही तर सैन्यात अधिकारी असल्याचे सांगून दोन वर्षांपुर्वी त्याने इंजीनिअर असलेल्या मुलीसोबत लग्नही केलं आहे. मिलिट्री इंटेलिजन्स बर्‍याच दिवसापासून त्याचा मागावर होतं. अखेर अहमदनगर पोलीसांच्या मदतीने शुक्रवारी या तोतया अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.