मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव

देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली
Manu Kumar Shrivastav | मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव
Manu Kumar Shrivastav | मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव SaamTvNews
Published On

मुंबई : गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव (Manu Kumar Shrivastav) यांची राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary) म्हणून आज नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chkraborty) यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. चक्रवर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीवास्तव यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

हे देखील पहा :

मनु कुमार श्रीवास्तव यांचा जन्म १५ एप्रिल १९६३ रोजी झाला असून मूळचे उत्तरप्रदेशातील लखनौ येथील असणारे श्रीवास्तव १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी भौतिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

Manu Kumar Shrivastav | मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव
अमरावतीत संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; "डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत"

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com