Prakash Ambedkar : विधानसभेत मनोज जरांगेंनी कोणती भूमिका घ्यावी? प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा सल्ला

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : विधानसभेत मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी,असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
विधानसभेत मनोज जरांगेंनी कोणती भूमिका घ्यावी? प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा सल्ला
Maratha ReservationSaam Digital
Published On

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. काही पक्षांनी उमेदवार देखील जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर मानलेले गेलेले मनोज जरांगे विधानसभेसाठी काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांना मोलाचा सल्ला दिला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ८०० अर्ज आले आहेत. खरं तर त्यांनी जरूर निवडणूक लढवावी. एकट्याने निवडणूक लढावावी आणि ती जिंकावी'.

विधानसभेत मनोज जरांगेंनी कोणती भूमिका घ्यावी? प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा सल्ला
Jitendra Awhad On Prakash Ambedkar: लग्न एकाशी आणि हुंडा दुसऱ्याकडून...; प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर आव्हाडांचं प्रत्युत्तर

अनुसूचित जाती-जमातींसाठीही क्रिमीलेअर लागू करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकराने जीआर काढल्याची माहिती प्रकश आंबेडकरांनी दिली. या निर्णयाला प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला. अनुसूचित जातीत वर्गीकरण आणि क्रिमीलेअरचा निर्णय कोर्ट घेणार की लोकसभा घेणार? राजकीय पक्ष एससी, एसटी आरक्षण निकामी करण्याचं काम करत आहेत. मागील ७० वर्षांत १.७ टक्के कुटुंब लाभ घेत आहेत. वर्चस्वादी आणि मनुवादी व्यवस्थेला पुन्हा गुलामी आणायची आहे. जाता जाता मतदार वाढवण्यासाठी हे काम केलं आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

'नवं सरकार करायचं असेल आणि बहुजन आघाडीचा पाठिंबा हवा असेल तर या निर्णयाला बाजूला ठेवावा लागेल. आरक्षण विभाजित करण्यात येत आहे. यामध्ये ज्यांनी आतापर्यंत आरक्षण घेतलं आहे. त्यांना आता क्रिमीलेअरमध्ये घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभेत मनोज जरांगेंनी कोणती भूमिका घ्यावी? प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा सल्ला
Manoj Jarange : विधानसभेसाठी जरांगे फॅक्टर चालणार? 100 % मराठ्यांना मतदानाचं आवाहन

प्रकाश आंबेडकर पाठवणार निवडणूक आयोगाला पत्र

विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, 'निवडणूक आयोगाने एका टप्प्यात मतदान घेत असून ही बाब उत्तम आहे. मात्र, निकाल देखील दुसऱ्याच दिवशी देणे अपेक्षित आहे. मतदानानंतर दोन दिवस काढण्याची गरज नाही. हरियाणामध्ये जे आरोप होत आहेत, ते राज्यातही होऊ शकतात. त्यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला पात्र पाठवणार आहोत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com