Manoj Jarange : विधानसभेसाठी जरांगे फॅक्टर चालणार? 100 % मराठ्यांना मतदानाचं आवाहन

Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा कऱण्यात आली आहे. मराठा आरक्षण लागू न झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिक घेत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Manoj Jarange Patil
Published On

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरला होता. जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील 8 मतदारसंघात महायुतीचा धुव्वा उडाला होता. विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर प्रभावी ठरणार का? याची उत्सुकता आहे. आचारसंहिता जाहीर होताच मराठ्यांनी १०० टक्के मतदान करण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. (Manoj Jarange Patil Latest News)

गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणावरुन जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष पेटलाय. जरांगेंनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचा मुहूर्तावर १७ सप्टेंबरपासून सातवं आमरण उपोषण सुरु केलं होतं. मात्र प्रकृती खालावल्याने उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांनी वारंवार आचारसंहिता लागायच्या आत आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र जरांगेंच्या इशाऱ्याची सरकार दखल घेतली नाही. आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकांचा आणि निर्णयांचा धडाका सुरू होता. तब्बल 80 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच जरांगेंनी मराठ्यांना १०० टक्के मतदान करण्याचं आवाहन केलंय. आचारसंहिता लावून मराठ्यांचं वाटोळं केलं, असा संताप जरांगेंनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध केलाय. (Manoj Jarange Patil Criticized Devendra Fadnavis )

Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Election : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस ११९ जागा; ठाकरे, पवारांना किती?

मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानं महायुतीचं टेन्शन वाढलंय. तर दुसरीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र सुखावला असेल.कारण विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील यांचा इफेक्ट राहणार असल्याचं बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलंय.

Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला निकाल, EC कडून घोषणा

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्याने सत्ताधाऱ्यांचं गणित बिघडवलं होतं. मराठवाड्यातील 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धुव्वा उडाला. केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकता आली. मविआनं जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेडची जागा जिंकली. मराठवाड्यात 48 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेला मराठवाड्यातील 48 पैकी 34 विधानसभा मतदारसंघातून मविआला आघाडी मिळाली होती. जात मोठी करायची की आमदार हे तुमच्या हातात आहे, असं सूचक विधान जरांगेंनी केलंय. जरांगेंचा प्रभाव आणि त्यांनी उमेदवार पाडण्याचा दिलेला इशारा पाहता आरक्षण मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com