Manoj Jarange : '५७ लाख मराठा बांधव ओबीसीत आले आहेत, पण सरकार...'; मनोज जरांगे यांचा मोठा दावा

Manoj Jarane News: मनोज जरांगे यांच्याकडून आगामी विशेष अधिवेशनात सगेसोयरे कायदा पारीत करण्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान, '५७ लाख मराठा बांधव ओबीसीत आले आहेत, पण सरकार डेटा देत नाही, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

आवेश तांदळे, मुंबई

Manoj Jarange on OBC Reservation:

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काही आठवड्यांपूर्वी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर आता मनोज जरांगे यांच्याकडून आगामी विशेष अधिवेशनात सगेसोयरे कायदा पारीत करण्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान, '५७ लाख मराठा बांधव ओबीसीत आले आहेत, पण सरकार डेटा देत नाही, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

शिवाजी मंदिर येथे दिवगंत शशिकांत पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात मनोज जरांगे बोलत होते. मनोज जरांगे म्हणाले, सगळ्या मराठा नेत्यांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. मी प्रामाणिकपणे लढत आहे. सगेसोयरेसंबंधी एकदा कायदा पारित झाला की आपली लढाई संपली. राकेश टिकैत हिंदीत बोलत होते, काही समजत नव्हते. मी त्यांचा होला हो म्हटलं. ५७ लाख मराठा बांधव ओबीसीमध्ये आले आहेत, सरकार डाटा देत नाही'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | दाढीवाल्यानंच तुमची गाडी खड्ड्यात आणली- एकनाथ शिंदे

'माझ्या मते दीड कोटी मराठा ओबीसीमध्ये आले आहेत. पहिल्यांदा मराठा बांधव एकत्र आले आहेत. मी 24 घंटे काम करत आहे. आता मी दोन दिवस झोपणार नाही. रात्र आणि दिवस मराठा समाजासाठी करत आहे. 15 तारखेला अधिवेशन आहे. मी सर्व आमदार आणि मंत्र्यांनी एकत्र येऊन कायदा पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले.

Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis News : प्रत्येक मतदारापर्यंत मोदींचा संदेश पोहचवणार, देवेंद्र फडणवीस यांचे विधान

'सर्व मराठा बांधवांनी मराठा समाज आणि मंत्र्यांना फोन करून सांगा की, आपल्याला पाठिंबा द्यावा. आमदार आणि मंत्र्यांनी आपल्याला पाठिंबा दिला. आता त्यांची गाठ माझ्यासोबत आहे, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com