Mumbai Maratha Andolan: नवी मुंबईत धडकलं मराठा वादळ, आंदोलकांची फौज पाहून सरकारला धास्ती; आज मोठा निर्णय होणार?

Mumbai Maratha Mocha: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा म्हणून नावारुपाला आलेले मनोज जरांगे पाटील गुरुवारी रात्री (२५ जानेवारी) नवी मुंबईत पोहचले.
navi mumbai maratha morcha
navi mumbai maratha morchaSaam TV
Published On

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Andolan

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा म्हणून नावारुपाला आलेले मनोज जरांगे पाटील गुरुवारी रात्री (२५ जानेवारी) नवी मुंबईत पोहचले. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधवांनी देखील नवी मुंबईत धडक दिली. आंदोलकांची संख्या इतकी होती, की नवी मुंबईतील संपूर्ण रस्ते जाम झाले. रात्री जरांगेसह मराठा बांधवांनी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

navi mumbai maratha morcha
Terrorists Caught: प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट उधळला; तीन सशस्त्र दहशतवादी पकडले, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

यावेळी स्थानिक मराठा संघटनांनी (Maratha Andolan) जरांगे यांच्यासह आंदोलकांच्या जेवणाची तसेच राहण्याची सोय केली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला होता. नवी मुंबई महापालिका देखील दिमतीला हजर होती.

महापालिकेने पाण्याचे टँकर तसेच फिरते शौचालय सुविधा दिली होती. संध्याकाळी ७ वाजल्यानंतर जरांगेंच्या ताफ्यातील ग्रामीण भागातून दाखल झालेली वाहनांनी नवी मुंबईत येत होती. यावेळी पनवेल ते वाशी असा येण्याचा मार्ग बदलून पामबीच मार्ग करण्यात आल्याने सर्वत्र गर्दी पहायला मिळाली. (Latest Marathi News)

नवी मुंबईत मुख्यस्थळी ५ लाखांहून अधिक नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, आज जरांगे यांची वाशी येथे जाहीर सभा होणार असून या सभेनंतर ते मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांना आंदोलनाचं स्वरुप येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी शिंदे सरकारचे प्रयत्न सुरू आहे. गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेत मनभरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. आज पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार असून या भेटीत नेमका काय तोडगा निघतो? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

navi mumbai maratha morcha
Daily Horoscope: कुंभसह ५ राशींच्या लोकांना आज मिळणार गोड बातमी; वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com