मुंबईत मॅनहोलची झाकणं होतायत चोरी; प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल...

मॅनहोलचे झाकण हे लोखंडी आणि मजबूत स्वरूपाचे असतात. एका झाकणाची किंमत अंदाजे बारा हजार रुपये इतकी असते.
मुंबईत मॅनहोलची झाकणं होतायत चोरी; प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल...
मुंबईत मॅनहोलची झाकणं होतायत चोरी; प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल...सुमित सावंत

मुंबई: अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी या परिसरातील मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले असून त्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Manhole cover being stolen in Mumbai; BMC lodges complaint with police)

हे देखील पहा -

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या के/पूर्व विभाग अंतर्गत अंधेरी (पूर्व), विलेपार्ले (पूर्व) व जोगेश्‍वरी (पूर्व) या पश्चिम उपनगरांमध्‍ये मलःनिसारण वाहिनीचे जाळे महानगरपालिकेतर्फे उभारण्‍यात आलेले आहे. मलःनिसारण वाहिनी स्वच्छ करण्‍यासाठी व नियमित तपासणी करण्यासाठी वाहिनीला ठराविक अंतरावर मॅनहोल आणि त्यावर झाकण दिलेले असतात. सदर वाहिनी ही १५ ते २५ फूट खोल असल्‍यामुळे चांगली सुरक्षितता असावी म्हणून मॅनहोलचे झाकण हे लोखंडी आणि मजबूत स्वरूपाचे असतात. एका झाकणाची किंमत अंदाजे बारा हजार रुपये इतकी असते.

के/पूर्व विभागात वेगवेगळ्या परिसरात असलेल्या मलनिःसारण वाहिन्यांवरील लोखंडी झाकणाला चोरट्यांनी लक्ष्‍य बनविले आहे. मागील काही दिवसांपासून के/पूर्व विभागात अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात मिळून अशी सुमारे २० ते २५ झाकणं चोरीला गेलेली आहेत. विशेषतः अंधेरी एमआयडीसी परिसरात अधिक संख्येने झाकणं चोरीला गेली आहेत. या झाकणांची चोरी पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मॅनहोल उघडे राहिल्‍यामुळे त्‍या मॅनहोलमध्‍ये एखादी व्यक्ती पडून अथवा धावत्या वाहनांचे चाक अडकून अपघात होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे मॅनहोलवर झाकण नसल्याचे आढळताच नवीन झाकण लावण्याची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात आली. मात्र, झाकणं वारंवार गायब होत असल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. तसे, संबंधित स्‍थानिक पोलीस ठाण्‍यांना वेळोवेळी पत्राद्वारे देखील कळविण्‍यात आले आहे.

मुंबईत मॅनहोलची झाकणं होतायत चोरी; प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल...
हे काय? शिवसेनेच्या बॅनरवरुन चक्क उद्धव ठाकरेच गायब, राऊतांचा मात्र मोठा फोटो...

तरीही, मॅनहोल झाकण चोरीला जाण्याचे प्रकार सतत वाढीस लागल्याने अखेरीस, संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्या आधारे, के/पूर्व विभागातील महानगरपालिका अधिकाऱ्यांमार्फत एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे व सहार पोलिस ठाणे येथे अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com