गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; दुपारी ३ वाजल्यापासून 'या' भागांमध्ये 'नो-एन्ट्री'

वाहतूक शाखेकडून 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये दुपारी तीन पासून आवश्यकेतनुसार वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
Pune Ganesh Festival Traffic News
Pune Ganesh Festival Traffic NewsSaam TV
Published On

पुणे: दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधांविना साजरा होणारा यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) आणि या उत्सवासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता. वाहतूक शाखेकडून 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान शहराच्या (Pune) मध्यवर्ती भागामध्ये दुपारी तीन पासून आवश्यकेतनुसार वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने बंद आणि चालू असणाऱ्या रस्त्यांची माहिती दिली आहे ती पुढील प्रमाणे -

बंद असणारे रस्ते -

लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते टिळक चौक.

छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी रस्त्यावरील स.गो. बर्वे ते जेधे चौक.

बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते आप्पा बळंवत चौक.

टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ते हिराबाग चौक.

अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदिश गॅरेज उपरस्ता) ते टिळक रोडकडे जाण्यास बंदी.

सणस रस्ता : गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक.

वरील बंद असणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग -

डुल्या मारूती चौक, दारूवाला पूल, अपोलो टॉकीज पाठीमागील मारणे रस्त्यावरून सिंचन भवन.

शाहीर अमर शेख चौक, कुंभारवेस चौक, म.न.पा. भवन पाठीमागील रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडी पेठ पोलिस चौकी पुढे शंकर शेठ रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, रस्ता टिळक चौक टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा.

सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौक मार्गे नेहरु रस्त्याचाचा वापर करुन स्वारगेटकडे जावे.

कुंभारवेस चौक- पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ताड मार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, घोरपडी पेठ उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रस्ता वापरावा.

Pune Ganesh Festival Traffic News
कौतुकास्पद! अवघ्या ७ वर्षीय व्योमने केले भगवत गीतेचे सर्व अध्याय तोंडपाठ; मिळवला प्रथम क्रमांक

पूरम चौक, टिळक चौकातून उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक असा वापरावा.

जेधे चौक, नेहरू स्टेडीयम समोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा, उजवीकडे वळून पूरम चौक, हिराबाग. (पीएमपीएल बस व तीन चाकी रिक्षा वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना येथे बंदी असणार आहे.)

गोटीराम भैय्या चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, डावीकडे वळून कस्तुरे चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करावा.

तसेच या कालावधीमध्ये पार्किंगची व्यवस्था पुढीलप्रमाणे असेल.

नो पार्किंग असलेली ठिकाणं -

Pune Ganesh Festival Traffic News
Navi Mumbai News : घर घेऊ इच्छुकांसाठी आनंदाची बातमी; सिडकोकडून 'इतक्या' घरांसाठी लॉटरी जाहीर

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौकय

मंडई ते शनिपार चौकय

बाजीराव रस्त्यावरील शनिपार ते फुटका बुरूजपर्यंतय

आप्पा बंळवंत चौक ते बुधवार चौक

पार्किंग असलेली ठिकाणं -

विमलाबाई गरवारे कॉलेज, एच.व्ही. देसाई कॉलेज, मनपा विद्यालय, पुलाची वाडी नदी किनारी, दारूवाला पुल ते खडीचे मैदान, काँग्रेस भवन मनपा रस्ता, व्होल्गा चौक ते मित्र मंडळ चौक, कॅनॉलच्या कडेस, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याची डावी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, सर्कस मैदान, टिळक पुल ते भिडे पूल नदी किनारी, नारायण पेठ हमालवाडा पार्कींग.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com