Maharashtra Weather Forecast : मुंबई आणि उपनगरात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain: पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे.
Mumbai Weather Update
Mumbai Weather Updatesaam Tv

Mumbai Weather Update:

पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागानुसार पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. गणेश चतुर्थीनंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. जर हा अंदाज खरा ठरला तर खरीप पिकांना याचा फायदा होईल. पुढील पाच दिवस मु्ंबई आणि उपनगरात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. (Latest News)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईच्या हवामानात मोठा बदल झालाय. त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईत ढगाळ वातावरण तयार झालं असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. दरम्यान पुढील ४ ते ५ दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Weather Update
Ganesh Festival 2023 : गणेशोत्सव दहा दिवस का साजरा केला जातो?जाणून घ्या

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे. उद्यापासून राज्यामधील काही भागात पावसाचा जोर तीव्र होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलीय. दरम्यान हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला नाही. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस झाला आहे. यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाणेसह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात पाऊस होत आहे.

Mumbai Weather Update
Jyeshtha Gauri Pujan 2023: तयारी झाली का? १९ सप्टेंबरला गणराया येणार घरोघरी, ज्येष्ठागौरी पूजन कधी? जाणून घ्या

आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचं अंदाज आहे. याशिवाय रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. पुढील पाच दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातही पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Mumbai Weather Update
Chandrapur News : चंद्रपूर शहरात ढगसदृश्य पाऊस! नदी नाल्याकाठच्या घरांमध्ये पाणी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com