Maharashtra Rain : गरज पडली तर एअरलिफ्ट करा, पुरातून लोकांना वाचवा; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रशासकीय यंत्रणांना आदेश

Cm Enath Shinde on Maharashtra Rain : गरज पडली तर एअरलिफ्ट करा, पुराच्या पाण्यातून नागरिकांना वाचवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.
गरज पडली तर एअरलिफ्ट करा, पुरातून लोकांना वाचवा; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रशासकीय यंत्रणांना आदेश
CM Eknath ShindeSaam Digital
Published On

गेल्या २४ तासांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई, पुणे आणि रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं.

गरज पडली तर एअरलिफ्ट करा, पुरातून लोकांना वाचवा; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रशासकीय यंत्रणांना आदेश
Manoj Jarange Patil : नितेश राणेंना समजावून सांगा, माझा पट्टा तुटला तर कठीण होईल; मनोज जरांगे भडकले

गरज पडली तर एअरलिफ्ट करा, पुराच्या पाण्यातून नागरिकांना वाचवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मुंबई पुण्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहेत".

"कोणतीही काळजीचं कारण नाही. मात्र, नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास तरच घराच्या बाहेर पडावं, असं आवाहन मी करतो. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, "एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे".

"मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. मुंबईत काही कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे".

"मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे. पाऊ आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, माझं आपणास आवाहन आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करीत आहे", असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गरज पडली तर एअरलिफ्ट करा, पुरातून लोकांना वाचवा; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रशासकीय यंत्रणांना आदेश
Pune Heavy Rain : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात पाणी शिरलं; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com