Manoj Jarange Patil : नितेश राणेंना समजावून सांगा, माझा पट्टा तुटला तर कठीण होईल; मनोज जरांगे भडकले

Manoj Jarange Patil warn to Nitesh Rane : निलेश राणे यांनी आमदार नितेश राणेंना समजावून सांगावं, अन्यथा माझ्या तोंडाचा पट्टा तुटला तर कठीण होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil warn to Nitesh Rane Narayan Rane
Manoj Jarange Patil warn to Nitesh Rane Narayan RaneSaam TV
Published On

मनोज जरांगे पाटील ज्याअर्थी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताहेत, त्याअर्थी त्यांच्या पाठीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा अदृश्य हात आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतलाय. राणे कुटुंबाविषयी माझ्या मनात आदर आहे म्हणून मी अजून त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं नाही. त्यांनी उगाच काहीगोष्टी अंगावर ओढवून घेऊ नये, असं मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil warn to Nitesh Rane Narayan Rane
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठं खिंडार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टायमिंग साधलं

माझी निलेश राणे (Nilesh Rane) यांना विनंती आहे की, त्यांनी आमदार नितेश राणे यांना समजावून सांगावं. अन्यथा माझ्या तोडचा पट्टा तुटला तर त्यांना खूप कठीण जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांसोबत बोलत होते. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना जे अभियान करायचंय ते करू द्या कारण, मराठा समाजाच्या लक्षात आलंय, की भाजप नेते मला टार्गेट करताय, असंही जरांगे म्हणाले.

अंतरवाली सराटी येथे सुरू केलेलं आमरण उपोषण बुधवारी मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. उपोषणामुळे माझी तब्येत बरी नाही. मात्र, मी २७ तारखेला अंतरवाली सराटी येथे दर्शनाला जाणार आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितलं.

उपोषण सुरू असताना अंतरवाली सराटीत बसून काम होत नव्हतं. आता इथं बसून काम होईल, मी कामाला लागलोय, असंही जरांगेंनी म्हटलंय. सरकारवर आमचा विश्वास नाही असा शब्द मी वापरणार नाही. त्यांनी नवीन डेडलाईन मागितली होती. त्यामुळे मी १३ ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. शंभूराज देसाई यांनी वेळ लागेल असं मला सांगितलंय. पण काल रात्रीच मी निवडणुकीसाठी बरेच उमेदवार निवडले आहेत, असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी चर्चा केली होती. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, शरद पवार आमच्या बाजूने काही बोलले असतील हे वाटत नाही. जर बोलले असतीलच त्यांनी थेट सांगावं उगाच काहीतरी लपवू नये. २९ ऑगस्टला मराठा समाजाची बैठक बोलावून सगळं जाहीर करणार, आमची बाजू मांडणारा जो कुणी असेल त्यांनाच आम्ही निवडून आणणार, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Manoj Jarange Patil warn to Nitesh Rane Narayan Rane
Manoj Jarange Patil : अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती; मी काय दहशतवादी आहे का? मनोज जरांगे संतापले, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com