Rain Alert : राज्याला पुढील २ दिवस पाऊस झोडपणार, पुण्याला रेड अलर्ट; इतर जिल्ह्यांमध्ये कसं हवामान? वाचा

Maharashtra Weatehr Update News : हवामान विभागाने पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
MAHARASHTRA RAIN UPDATE: IMD ISSUES RED ALERT FOR PUNE GHAT REGION, ORANGE ALERT FOR KONKAN GHATS
MAHARASHTRA RAIN UPDATE: IMD ISSUES RED ALERT FOR PUNE GHAT REGION, ORANGE ALERT FOR KONKAN GHATSSaam Tv
Published On
Summary
  • पुणे घाटमाथ्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

  • रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट

  • विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज

  • मुंबईत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस कायम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने आज (ता. २६) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह उपनगरात रात्री पासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असून आज ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम सुरु राहील.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार सरींसह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

MAHARASHTRA RAIN UPDATE: IMD ISSUES RED ALERT FOR PUNE GHAT REGION, ORANGE ALERT FOR KONKAN GHATS
Ladki Bahin Yojana : खात्यात 1500 येईना, लाडकींचे टेन्शन वाढले; मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

MAHARASHTRA RAIN UPDATE: IMD ISSUES RED ALERT FOR PUNE GHAT REGION, ORANGE ALERT FOR KONKAN GHATS
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांसाठीही हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com