Maharashtra Rain Forecast : राज्यात घटस्थापनेला विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार?, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Rain Alert in Maharashtra : हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
IMD Predict Mumbai Heavy Rain Alert
IMD Predict Mumbai Heavy Rain AlertSaam TV
Published On

Maharashtra Rain Update :

मान्सूनने महाराष्ट्रातून जवळपास माघार घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून पावसाने सुट्टी घेतली आहे. आता ऑक्टोबर हीटच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. मात्र घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. कारण अनेक पिके आता काढणीला आली आहेत. या पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. (Latest Marathi News)

IMD Predict Mumbai Heavy Rain Alert
Shardiya Navratri Day 1 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा शैलीपुत्री देवीची पूजा, जाणून घ्या महत्त्व

कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात. तर उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ऑक्टोबरचे हीटचे चटके

मान्सूनच्या एक्झिटनंतर हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात अनेक भागात कडाक्याचं ऊन आहे. ऑक्टोबर हीटचे चटके नागरिकांना जाणवत आहेत. शनिवारी राज्यात अकोला आणि ब्रह्मपूरी येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

IMD Predict Mumbai Heavy Rain Alert
Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; अपघात नेमका कसा झाला? ड्रायव्हरनेच सांगितलं...

मुंबईत धुक्याची चादर

रविवारी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही धुक्याची चादर पाहायला मिळाली. सकाळी वातावरणात गारवा जाणवत होता. त्यामुळे दिवसभर कडक ऊन आणि सकाळी गारवा असं मिश्र वातावरण सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com