Pune Dj Party : पबच्या पार्किंगमध्ये 'भाई'ची डीजे पार्टी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Pune Crime : पुण्यातील विमाननगरमध्ये पोलिस ठाण्याच्या अगदी जवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीने डीजे पार्टी आयोजित केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Pune Dj Party : पबच्या पार्किंगमध्ये 'भाई'ची डीजे पार्टी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Pune Crimesaam tv
Published On
Summary
  • पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळीने थाटात डीजे पार्टी केली

  • पबच्या पार्किंगमध्ये मोठ्या आवाजात गाणी, फटाके आणि गर्दी

  • पोलिस स्टेशनजवळच असलेल्या या पार्टीमुळे नागरिक भयभीत

  • सोशल मीडियावर पार्टीचे व्हिडिओ व्हायरल; पोलिसांची कारवाई अद्याप नाही

पुण्यातील विमाननगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. परिसरातील थ्री मस्केटियर्स (Three Musketeers) पबच्या पार्किंगमध्ये शनिवारी मध्यरात्री एक डीजे बर्थडे पार्टी पार पडली, मात्र ही पार्टी नेहमीसारखी नव्हती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींनी ही पार्टी आयोजित करून परिसरात प्रचंड गोंधळ घातला. विशेष म्हणजे, ही पार्टी विमानतळ पोलिस स्टेशनच्या अगदी जवळच, म्हणजे अक्षरशः हाकेच्या अंतरावरच पार पडली.

या पार्टीचा आयोजक फिरोज शेख, ज्याच्यावर सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा आधीच नोंदवलेला आहे. त्यानेच या पार्टीचे आयोजन करून शंभरहून अधिक तरुणांना एकत्र केले. या गर्दीत गुन्हेगारी जगतातील इतरही काही बड्या नावांचे हजेरी लावल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकताच 'मकोका' अंतर्गत येरवडा कारागृहातून मुक्त झालेला आकाश कंचिले देखील आपल्या टोळीसमवेत या पार्टीत सहभागी होता. ही पार्टी त्याच टोळीतील निखिल कांबळेच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यावर येरवडा पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे.

Pune Dj Party : पबच्या पार्किंगमध्ये 'भाई'ची डीजे पार्टी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Pune Crime: मला माहिती नाही माझ्या पत्नीचं काय झालं, खरपुडीमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार?

या डीजे पार्टीचे व्हिडिओज निखिलच्या पेनटरने थेट इंस्टाग्रामवर अपलोड केले आणि ते अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडिओत मोठ्या आवाजात डीजे, गर्दीचा जल्लोष आणि फटाक्यांचा आवाज ऐकू येतो, तर काही क्लिप्समधून "भाई"ची दहशत दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.

Pune Dj Party : पबच्या पार्किंगमध्ये 'भाई'ची डीजे पार्टी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Pune Crime: दुचाकीला कट का मारला? रागाच्या भरात हवेत गोळीबार,अवघ्या 24 तासात पुण्यात 2 गोळीबाराच्या घटना

हैदोस घातलेल्या या पार्टीमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती अशा प्रकारे खुलेआम गर्दी जमवून, गोंधळ घालून, पोलिसांच्या नजरेसमोर हे सर्व करतात, हे धक्कादायकच आहे. नागरिक आता विचारत आहेत की, पोलिसांनी या प्रकाराकडे डोळेझाक का केली? कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओच्या माध्यमातून ही घटना चांगलीच गाजत असून, पोलीस खात्याकडून कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Q

ही डीजे पार्टी कोणत्या ठिकाणी झाली?

A

विमाननगरमधील थ्री मस्केटियर्स पबच्या पार्किंगमध्ये ही पार्टी पार पडली.

Q

पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं?

A

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फिरोज शेखने ही पार्टी आयोजित केली होती.

Q

कोणते गुन्हेगार उपस्थित होते?

A

निखिल कांबळे, आकाश कंचिले यांसारखे गुन्हेगार आणि त्यांची टोळी या पार्टीत सहभागी होती.

Q

सोशल मीडियावर काय व्हायरल झालं आहे?

A

पार्टीचे व्हिडिओ निखिल कांबळेच्या पेनटरने इंस्टाग्रामवर टाकले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com