Maharashtra Politics: लोकसभेसाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लान; १० विश्वासू नेत्यांवर सोपावली विशेष जबाबदारी

Maharashtra Political News: उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे.
Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena Make Lok sabha 2024 Plan Sanjay Raut Rajan Vichare
Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena Make Lok sabha 2024 Plan Sanjay Raut Rajan VichareSaam TV
Published On

Maharashtra Political Latest News

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने मास्टर प्लान आखला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या १० नेत्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यामध्ये खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, सुनील प्रभू, भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्यासह आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्व नेत्यांवर वेगवेगळ्या विभागाची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena Make Lok sabha 2024 Plan Sanjay Raut Rajan Vichare
IMD Rain Alert: राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; पुढील ३-४ तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार

कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी?

खासदार संजय राऊत यांच्याकडे लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी चिंचवड, मावळ) मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अनंत गीते यांच्या खांद्यावर कोकण (रायगड) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते रायगड, मावळ (विधानसभा पनवेल, कर्जत, उरण ) मतदारसंघात पक्षवाढीसाठी तसेच निवडणुकीची जबाबदारी पार पाडणार आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. खैरे संभाजीनगर, जालना लोकसभा मतदारसंघात काम पाहणार आहे.

खासदार अरविंद सावंत यांच्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ - वाशिम, वर्धा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचं काम पाहणार आहे.

खासदार अनिल देसाई यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल देसाई हे सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी मतदारसंघात काम पाहणार आहे.

आमदार सुनील प्रभू मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापूर धाराशीव, लातूर, बीड लोकसभेसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आमदार भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

खासदार विनायक राऊत यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अरविंद सावंत हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीवर भर देणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने खासदार राजन विचारे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. राजन विचारे हे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करतील.

आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena Make Lok sabha 2024 Plan Sanjay Raut Rajan Vichare
Pune News: पुणे-नगर महामार्गावर गॅस टँकरचा अपघात; मोठ्या प्रमाणात वायूगळती, धडकी भरवणारा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com