Maharashtra Polilitcs: मुंबईत ठाकरे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Uddhav Thackeray: मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. मुंबईतील अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
Maharashtra Polilitcs: मुंबईत ठाकरे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra PolilitcsSaam Tv
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशामध्ये मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. आरपीआय दिपक निकाळजे गटाचा नेता, एल्गार कामगार संघटनेच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली. त्याचसोबत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री या निवासस्थानी आज अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली. आर.पी.आय दिपक निकाळजे गटाचे उत्तर पश्चिम जिल्हा प्रमुख आशुतोष निकाळजे आणि एल्गार कामगार संघटना अध्यक्ष श्रीयुत सर्जेराव कांबळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश केला.

Maharashtra Polilitcs: मुंबईत ठाकरे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; अहिल्यानगरमधील शिलेदार कार्यकर्त्यांसह ओवेसींना साथ देणार

यासोबतच, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचे ठाकरे गटात स्वागत केले. या सर्वांच्या हातामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला जिंकून आणण्यासाठी आम्ही जोर लावून असे आश्वासन या सर्वांनी दिलं.

Maharashtra Polilitcs: मुंबईत ठाकरे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

उद्धव ठाकरे यांनी यावेळी महायुतीवर जोरदार टीका केली, ते म्हणाले, 'मला जे बोलायचे होते ते भर पावसात मी शिवाजीपार्कमध्ये बोललो आहे.तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे. आज ज्या उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आला आहात तुमचे स्वागत. पुढचा कार्यक्रमक हाच आहे खरी देशभक्ती आणि खरे हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची गरज आहे. काही जणांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्या आहेत. सगळीकडे रस्ते होर्डिंग्स आणि बॅनर्सनी बरबटून टाकले आहे. आले होते ब्रिटनचे पंतप्रधान, स्वागत कोण करतंय आपले उपमुख्यमंत्री. अरे पण तिथपर्यंत पोहचलात का? त्यांच्याशी बोलला आहेत का?'

Maharashtra Polilitcs: मुंबईत ठाकरे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

तसंच, 'त्या बॅनरकडे पाहिल्यावर असे वाटते की ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मिंदेसेनेत प्रवेश केला की काय? अशी सगळी धूळ फेक चालली आहे. त्यांना फक्त जाहिरातबाजी करायची आहे. त्यांना स्वत:च्या प्रसिद्धीचे वेड लागले आहे. शेतकरी तिकडे आक्रोश करत आहे. कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही.', असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Maharashtra Polilitcs: मुंबईत ठाकरे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics : योगेश कदमांना खिंडीत गाठलं, अनिल परबांनी नेमके काय केले आरोप?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com