Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना सोडण्यामागचं कारणही सांगितलं; म्हणाल्या...
Tejasvee GhosalkarSaam Tv

Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना सोडण्यामागचं कारणही सांगितलं; म्हणाल्या...

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी त्या भावुक झाल्या आणि त्यांनी शिवसेना सोडण्यामागचे कारण सांगितले.
Published on

Summary:

  • शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी सोडली पक्षाची साथ

  • तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

  • तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना का सोडली? यामागचे कारण सांगितले

  • त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली

महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं.

तेजस्वी घोसाळकर यांनी सकाळीच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट केली होती. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना शिवसेना सोडण्यामागचं कारण देखील सांगितले. प्रभागातील विकास कामांसाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना सोडण्यामागचं कारणही सांगितलं; म्हणाल्या...
Mumbai: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; सोशल मीडियावर पोस्ट करत केला 'जय महाराष्ट्र'

तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले की, 'हा निर्णय खूपच कठीण आहे. मनात खूप गोष्टी आहेत. मला खूप काही बोलायचं आहे. ज्यांनी मला ओळख दिली तो पक्ष सोडताना आणि परिवाला सोडताना खूप दु:ख होत आहे. प्रभागातील विकास कामांसाठी हा निर्णय मी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझ्या प्रभागात विकास कामे होतील, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा संथगतीने सुरू असलेल्या सीबीआय तपासाला वेग येईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.'

Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना सोडण्यामागचं कारणही सांगितलं; म्हणाल्या...
Maharashtra Politics: मोठी बातमी! सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, भाजप-शिवसेनेतील वाद मिटला

दरम्यान, तेजस्वी घोसाळकर या मुंबै बँकेच्या संचालक आहेत. मुंबै बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती होण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी १३ मे रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महिला शाखेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबै बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

तेव्हापासून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी निर्णय घेत आज भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांचे पती विनोद घोसाळकर यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये हत्या करण्यात आली होती. ते त्यावेळी मुंबै बँकेचे संचालक होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर तेजस्वी घोसाळकर यांची नुयुक्ती करण्यात आली होती. आता तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.

Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना सोडण्यामागचं कारणही सांगितलं; म्हणाल्या...
Maharashtra Politics: महायुतीमध्ये पुन्हा नाराजीचा सूर, सुधीर मुंगटीवारांसह सत्तेतील आमदार सरकारच्या कामावर नाखूश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com