अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २ फेब्रुवारी २०२४
पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली दौरा केला होता. त्या पाठोपाठ आता संजय राऊत उद्या (३, फेब्रुवारी) शाखांचे उद्घाटन व जाहीर सभेसाठी डोंबिवलीत येणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभेवर ठाकरे गटाने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. संजय राऊत यांच्या दौऱ्यावरून शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाला लक्ष केले आहे.
काय म्हणाले राजेश मोरे?
"जे कधी घरातून बाहेर निघेल नाहीत, लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, त्यांना आत्ता समजतंय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्यांनी आयुष्यभर हुकुमशाही चालवली ते सांगतायत लोकशाही पद्धतीने मतदान करा, कितीही शाखा उघडल्या तरी लोकांना माहितीय कोण काम करतेय, आता शाखा उघडून काही उपयोग नाही असे म्हणत शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.
या दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाकडून मतदार राजा 'हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये. तुझं एक मत 'हुकूमशाही' अशा आशयाचे बॅनर डोंबिवलीत लावण्यात आले होते. ठाकरे गटाने लावलेल्या बॅनर बाबत मोरे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. "ज्यांनी आयुष्यभर हुकुमशाही चालवली, ते आता लोकशाही पद्धतीने मतदान करा असं सांगतात हे हास्यस्पद असल्याचा टोला राजेश मोरे यांनी लगावला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ठाकरेंच्या आज रायगडमध्ये तीन सभा...
आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) दृष्टीने ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा रायगडमध्ये जनसंवाद दौरा सुरू आहे. दिवसभरात ठाकरेंच्या तीन सभा पार पडणार असून या सभेंमधून ते कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.