Bacchu Kadu VIDEO : महायुतीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीत जाणार का? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

MLA Bacchu Kadu Reaction On Will Leave Mahayuti: आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीत जाणार का? असा प्रश्न समोर येतोय. यावर स्वत: बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू
MLA Bacchu KaduSaam Tv

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महायुतीला मोठे धक्के बसत आहे. आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलीय. बच्चू कडूंच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर बच्चू कडू महाविकास आघाडीत जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. यावर तिसरी महाविकास आघाडी करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिलीय.

बच्चू कडूंची भूमिका काय?

मागील काही महिन्यांपासून महायुती आणि बच्चू कडू यांच्यात अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आज बच्चू कडूंनी स्वत:च सांगितलंय की, जर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठकीत १५ ते २० मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यांच्यावर एकमत झालं (Maharashtra Politics) नाही, तर महायुतीतून बाहेर पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू अन् महायुतील वादाचे फटाके फुटताना दिसले होते. त्यानंतर ही मोठी बातमी समोर आलीय.

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

बच्चू कडू म्हणाले की, नाखुशीचा विषय नाही. शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. जर चर्चा सकारात्मक झाली नाही तर १५ ते २० आमदारांसोबत स्वतंत्र निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढवणार आहे. जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांबाबत झाले, तर मग स्वतंत्र लढवण्याचा विचार थांबवू. मजूर प्रकल्पग्रस्त, शेतकरी याबाबत निर्णय घेतले नाही तर बच्चू कडू स्वतंत्र लढणार. स्वत: कष्टकरी शेतकरी म्हणून लोकांसमोर जाणार असल्याचं खुद्द बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

बच्चू कडू
Bachhu Kadu : 'त्यांचं अंतर्मन भाजपचंच...', नवनीत राणांच्या पक्ष प्रवेशावरून बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

बच्चू कडू महाविकास आघाडीत जाणार का?

बैठकीत आमचं जर एकमत झाले नाही तर आम्ही (MLA Bacchu Kadu) वेगळा निर्णय घेऊ. सरकारच्या योजना या शेतकऱ्यांकडे पोहचल्या पाहिजेत. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. मी तिसरी आघाडी करणार, पण महाविकास आघाडीत जाणार नसल्याची भूमिका बच्चू कडूंनी स्पष्ट केलीय. आगामी विधानसभा निवडणूकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात (Bacchu Kadu Latest News) आहे. शेतीमालाचा भाव, दुधाचा भाव असे विविध मुद्दे बच्चू कडूंनी उपस्थित केले आहेत.

बच्चू कडू
सभांवरून Bachhu Kadu यांचा Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांन टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com