Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारमध्ये खांदेपालट? वाचाळ मंत्र्यांवर कारवाई होणार

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांचं खांदेपालट होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वाचाळ मंत्र्यांमुळे सरकार सध्या अडचणीत आले आहे. महायुतीमधील त्या त्या पक्षाच्या प्रमुखांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारमध्ये खांदेपालट? वाचाळ मंत्र्यांवर कारवाई होणार
Maharashtra Government Saam
Published On

Summary -

  • महाराष्ट्र सरकारमध्ये काही मंत्र्यांच्या खांदेपालटाची शक्यता

  • वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत

  • कारवाईचे अधिकार संबंधित पक्षप्रमुखांकडे

  • कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली

गणेश कवडे, मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांचं खांदेपालट होण्याची शक्यता आहे. वाचाळ मंत्र्यांमुळे अडचणीत आलेल्या सरकारचा जनतेच्या रोषातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फॉर्म्युला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वाचाळ मंत्र्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्या त्या पक्षाच्या नेत्यांची असणार आहे. युती सरकारमध्ये कारवाई करण्याचे अधिकार पक्षाच्या प्रमुखांकडेच आहेत.

वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत सरकारमधील मोठ्या नेत्यांचे खासगीत बोलतानाचे हे विधान आहे. युती सरकारमध्ये काम करताना कारवाईचे अधिकार पक्षाच्या प्रमुखांकडेच आहेत. थेट राजीनाम्याच्या ऐवजी खांदेपालट करून जनतेचा रोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे पक्षाचे प्रमुख नेते वाचाळ मंत्र्यांवर काय कारवाई करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकार अडचणीत येताना दिसत आहे. या वाचाळवीर मंत्र्यांमुळे विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे. या मंत्र्यांवर कारवाई करावी तसंच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. या वाचाळवीर मंत्र्यांमुळे सरकार कुठे तरी अडचणीत येत आहे. त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारमध्ये खांदेपालट? वाचाळ मंत्र्यांवर कारवाई होणार
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंवर कुरघोडी, नगरविकास'च्या उधळपट्टीला चाप? मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना

जर पक्षातील कोणताही मंत्री असे वक्तव्य करत असेल तर त्यांच्याविरोधात थेट कारवाई करण्याचा अधिकार पक्षाच्या प्रमुखांना आहे. भाजपमधील मंत्र्यांवर कारवाईचे अधिकार पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस, शिवसेनेत कारवाईचे अधिकार एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये कारवाई करण्याचे अधकार अजित पवार यांच्याकडे आहेत. सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी आधी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले त्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना शासनाला भिकारी म्हटले. त्यामुळे सध्या माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारमध्ये खांदेपालट? वाचाळ मंत्र्यांवर कारवाई होणार
Politics: ठाकरेंना बालेकिल्ल्यात शिंदेंकडून 'दे धक्का'; निलेश राणेंच्या उपस्थितीत बड्या नेत्यासह कार्यकर्ते शिंदे गटात
Q

महाराष्ट्रात मंत्र्यांच्या खांदेपालटाची शक्यता का आहे?

A

वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत आहे, त्यामुळे जनतेचा रोष कमी करण्यासाठी खांदेपालट होणार आहे.

Q

कोणत्या मंत्र्यांवर कारवाई होऊ शकते?

A

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सर्वाधिक चर्चा असून त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

Q

मंत्र्यांवर कारवाई करण्याचा अधिकार कोणाकडे आहे?

A

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस, शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्याकडे अधिकार आहेत.

Q

सरकारचा खांदेपालटामागे हेतू काय आहे?

A

जनतेचा वाढता रोष आणि विरोधकांचा दबाव कमी करून सरकारची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com