Maharastra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचा मोठा निर्णय; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडी बंद!

Mahayuti Big Dicision: महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Maharastra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचा मोठा निर्णय; घटक पक्षातील नेते अन् पदाधिकाऱ्यांना 'नो एन्ट्री'
MahayutiSaam
Published On

Summary -

  • स्थानिक निवडणुकांपूर्वी महायुतीचा मोठा निर्णय

  • घटक पक्षातील नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश नाही

  • भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील फोडाफोड रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल

  • विरोधी पक्षातील नेत्यांना मात्र पक्षात घेतले जाऊ शकते असा निर्णय झाला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. घटक पक्षातील नेत्यांना पक्षात एन्ट्री न देण्याचे ठरवले आहे. महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे महायुतीतील घटक पक्षाच्या कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. त्यात यापुढे महायुतीतील कोणत्याही नेत्याला, पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे. विरोधकांमध्ये कोणालाही फोडल्यास पक्षात प्रवेश द्यायला काही हरकत नाही. मात्र भाजपने शिंदेसेना आणि राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही. अशाप्रकारे अन्य दोन्ही घटक पक्षांनी भाजपच्या लोकांना पक्षात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Maharastra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचा मोठा निर्णय; घटक पक्षातील नेते अन् पदाधिकाऱ्यांना 'नो एन्ट्री'
Mahayuti Clash: राणेंविरुद्ध चव्हाण संघर्ष शिगेला! महायुतीत वादाचा भडका, स्पेशल रिपोर्ट

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, 'कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद असतात, पण आमच्यात मनभेद नाहीत. एकामेकाला आम्ही बोलू शकत नाही अशी परिस्थिती नाही. आम्ही पूर्वी जे ठरलं होतं त्याप्रमाणे महायुतीमधील कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही पक्षप्रवेश करायचा नाही यावर एकमत झाले आहे. दोन ते तीन दिवसांत ही बैठक होईल. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा भाजपमध्ये नाही, भाजपमध्ये शिवसेनाचा नाही, दोघं आहे म्हणून राष्ट्रवादीत नाही अशा प्रकारचे कुठलेही निर्णय करायचे नाही.'

Maharastra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचा मोठा निर्णय; घटक पक्षातील नेते अन् पदाधिकाऱ्यांना 'नो एन्ट्री'
MahaYuti Face Clash: महायुतीत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

महायुतीमध्ये एकजूट असल्याचे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले. विरोधकांमधील नेत्यांना पक्षात घेण्यास हरकत नाही, मात्र महायुतीतील घटक पक्षांमध्ये फोडाफोडी नको, अशी भूमिका महायुतीतील घटक पक्षांनी घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कल्याण-डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरूंग लागला. शिवसेनेतील अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Maharastra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचा मोठा निर्णय; घटक पक्षातील नेते अन् पदाधिकाऱ्यांना 'नो एन्ट्री'
Mahayuti Clash: सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात; मंत्री लोढांच्या वक्तव्याचा अमोल मिटकरींकडून समाचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com