MMR मध्ये सत्तेच्या चाव्या कुणाकडे? शिंदेंची नाकेबंदी, भाजप MMR मध्ये सक्रीय?

MMR Municipal Elections: मुंबई महानगर क्षेत्रातील 9 महापालिकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय... मात्र MMR मध्ये सत्तेच्या चाव्या नेमकं कुणाकडे जाणार? भाजपनं नेमकी काय रणनीती आखलीय?
Political battle intensifies as BJP pushes for dominance across 9 MMR municipal corporations
Political battle intensifies as BJP pushes for dominance across 9 MMR municipal corporationssaam tv
Published On

ज्यातील 29 महापालिकांपैकी 9 महापालिका मुंबई महानगर क्षेत्रात येतात...अशातच गेल्या काही वर्षांमध्ये या महापालिका क्षेत्रात बदललेल्या राजकीय गणितांमुळे सर्वच पक्षांनी MMRकडे लक्ष वेधलयं... ठाण्यात युतीच्या जागावाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द प्रमाण मानणाऱ्या भाजपनं MMR मध्ये मात्र एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलीय.. MMR मध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? पाहूयात...

वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई विधानसभा आणि नालासोपारा विधानसभेवर भाजपचं तर बोईसर विधानसभेवर शिंदेसेनेचं वर्चस्व... नवी मुंबई महापालिकेतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभेत भाजपचे आमदार सत्तेत...कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवली, कल्याण पूर्व विधानसभेवर भाजपचं वर्चस्व.. तर कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेसेनेचं वर्चस्व...

मिरा- भाईंदर महापालिकेत भाईंदर भाजपचं तर ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिंदेसेनेची सत्ता आहे... उल्हासनगर महापालिकेतील उल्हासनगर विधानसभेत भाजपची तर अंबरनाथ विधानसभेत शिंदेसेनेची सत्ता... भिवंडी निजामपूर महापालिकेतील भिवंडी पश्चिम विधानसभेत भाजपची तर भिंवडी पूर्वला समाजवादी पक्षाचा आमदार सत्ता आहे... पनवेल महापालिकेत भाजपचं वर्चस्व आहे...

1 लाख कोटींचं वार्षिक बजेट असलेल्या या 9 महापालिकांच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती ठेवण्यासाठी महायुतीसह ठाकरे बंधू आणि काँग्रेसनंही जोर लावलाय.... कोणत्या महापालिकेचं किती बजेट आहे पाहूयात...

मुंबई महापालिकेचं 74 हजार 427 कोटींचं बजेट आहे तर 81 हजार कोटींच्या ठेवी आहेत.. नवी मुंबई महापालिकेचं 5,709 कोटीचं बजेट तर 5,500 कोटींचं फिक्स डिपॉझिट आहे....ठाणे महापालिकेत 6,550 कोटींचं बजेट आहे. तर कल्याण डोंबिवलीचा 3,361 कोटींचा अर्थसंकल्प आहे. तर मिरा भाईंदर महापालिकेचं 2,694 कोटींचं बजेट आहे. वसई विरार महापालिकेत 3,926 कोटीचा अर्थसंकल्प आहे. तर उल्हासनगर महापालिकेचं 1,111 कोटीचं बजेट आहे... दुसरीकडे भिवंडी निजामपूर महापालिकेचा 1,097 कोटींचं बजेट आहे... तर पनवेल महापालिकेचं 2,500 कोटींचं बजेट आणि 600 कोटींच्या ठेवी आहेत.

दरम्यान याआधी झालेल्या महापालिका निवडणुकीत MMR क्षेत्रातील 9 पैकी 3 महापालिकांवर शिवसेना, 4 महापालिकांवर भाजप तर राष्ट्रवादी आणि हितेंद्र ठाकूरची बविआ यांची प्रत्येकी 1 महापालिकेवर सत्तेत होती... त्यामुळे ठाण्यातील जागावाटपात तडजोड स्विकारताना भाजपनं शिंदेसेनेची कोंडी करत MMR मधील 8 महापालिकांवर लक्ष केंद्रीत केलयं... आता या महापालिकांवर कोणाचा महापौर बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com