Maharashtra Politics : लोकसभेच्या निकालापूर्वीच महायुतीत वादाच्या ठिगण्या; निलेश राणेंनी छगन भुजबळांना सुनावलं

Nilesh Rane Warn Chhagan Bhujbal : भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट इशारा दिला आहे.
लोकसभेच्या निकालापूर्वीच महायुतीत वादाच्या ठिगण्या; निलेश राणेंनी छगन भुजबळांना सुनावलं
Nilesh Rane Warn Chhagan BhujbalSaam TV

अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. २८) विधानसभेच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केलं. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत खटाटोप होता कामा नये, असं भुजबळ यांनी म्हटलं.

त्याचबरोबर भाजपने आपल्याला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिला आहे, असंही भुजबळ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजीचा सूर पसरला आहे.

लोकसभेच्या निकालापूर्वीच महायुतीत वादाच्या ठिगण्या; निलेश राणेंनी छगन भुजबळांना सुनावलं
PM Narendra Modi : आता खेळातही मुस्लिमांसाठी वेगळा कोटा ठेवणार का? PM मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

भाजप नेते निलेश राणे यांनी X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, भुजबळ नेहमीच भाजपला डिवचण्याचं काम करतात. त्यांची ही भुमिका त्यांची बरोबर नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? असा सवाल देखील निलेश राणे यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, असंही राणे म्हणाले.

आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी भुजबळांना दिला आहे.

भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असंही निलेश राणे म्हणाले. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छगन भुजबळांच्या विधानावर भाष्य केलं आहे. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याने अधिक जागा लढेल, मात्र आम्ही मित्र पक्षांचा सन्मान ठेवू, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसला. पण निवडणुकीच्या निकालापूर्वीच नेत्यांमध्ये वादाच्या ठिगण्या पडत असल्याने विधानसभेत नेमकं काय होणार? तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार की, 'एकटा चलो'चा निर्णय घेणार, याची उत्सुकता अनेकांना आहे.

लोकसभेच्या निकालापूर्वीच महायुतीत वादाच्या ठिगण्या; निलेश राणेंनी छगन भुजबळांना सुनावलं
Pune Porsche Car Accident: मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही; दमानियांच्या आरोपांवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com