Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान

Nitesh Rane Statement: नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी थेट 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान
Nitesh Ranesaam tv
Published On

भाजपचे नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे नेहमी वादग्रस्त विधान करत असतात. हिंदुत्वाबाबत बोलत असताना त्यांनी थेट मुस्लिम समाजावर पुन्हा निशाणा साधला. 'गोल टोप्या घातलेल्या आणि दाढी असलेल्या लोकांनी मला मतदान केले नाही. मला हिंदूंनी मतदान केले आहे. त्यानंतर मी आमदार झालो. यामुळे मी हिंदूंची बाजू घेतली नाही, तर मी उर्दू लोकांची बाजू घेईन का?', असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

तसंच, 'हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे. मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे. मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार आहे.' असे वक्तव्य त्यांनी केले. नितेश राणे यांच्या या दाव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी जनतेच दबाव दबाव वाढत चालला आहे असे म्हटले होते. त्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना टोला लगावला. ते म्हणाले की, 'कुठली जनता मातोश्रीची आणि कलानगरची. ती जनता तर आमच्याबरोबर आहे. महाराष्ट्राच्या जनतेने १० महिने अगोदर निवडून दिले . आम्हाला पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिले नाही. कुठली जनता पाटणकर की ठाकरे केवढी जनता आहे त्यांची.'

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान
Nitesh Rane: आतंकवाद आणि जिहादचा रंग एकच तो म्हणजे हिरवा, नितेश राणे संतापले|VIDEO

मीरारोड येथील मराठीसाठी मनसेकडून जे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते आणि त्यांनी मराठी बोलून दाखवली. यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'जे मुसलमान बांधव त्यांच्या सभेत आले बघा आम्ही मराठी बोलतो. उद्याची अजान मराठीत सुरू करा. मराठीवर एवढेच प्रेम आहे तर सगळ्या मदर्सातील उर्दू बंद करून तिथे मराठी सक्ती करा. मग आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात. नुसतं अशा पद्धतीची थुकपट्टी ढोंगीपणा करायचा हे सर्वांना कळत आहे.

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान
Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com