Maharashtra Politics : रोहिणी खडसेंच्या 'त्या' विधानानंतर रुपाली चाकणकर संतापल्या; गंभीर आरोप करत उडवून दिली खळबळ

Rohini Khadse vs Rupali Chakankar : शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
Rohini Khadse vs Rupali Chakankar
Rohini Khadse vs Rupali Chakankar Saam TV
Published On

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची फेरी झाडल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे महिला नेत्या देखील एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

Rohini Khadse vs Rupali Chakankar
Maharashtra Politics : अजितदादा गटातील 2 नेत्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका; अन्यथा... शरद पवारांना कुणाचा इशारा?

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. मात्र, त्यांनी सर्वात आधी नगरसेवक होऊन दाखवावं, अशी खरमरीत टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. इतकंच नाही, तर रोहिणी खडसे यांच्यावर आरोप करत चाकणकर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, "ज्यांनी स्वतःचं कर्तुत्व नसताना फक्त वडिलांच्या नावावर राजकारणात पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे सीडी आहे असे सांगून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ती सीडी अजूनही बाहेर आलेली नाही".

"वडील शरद पवार गटाकडून विधान परिषदेचे सदस्य असतानाही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणारे आणि इतरांवर टीका करणाऱ्यांची मानसिकता व बुद्धिमत्ता किती आहे, हे यावरून कळून येते", असा टोलाही रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांना लगावला.

रोहिणी खडसे यांच्यावर मोठा आरोप

पुढे बोलताना रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर गंभीर आरोप केला. "लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून रोहिणी खडसे यांनी फक्त आणि फक्त भाजपचाच प्रचार केला,असं चाकणकर म्हणाल्या. दरम्यान, चाकणकर यांच्या या आरोपानंतर रोहिणी खडसे यांनी खरंच भाजपला लोकसभेत मदत केली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Rohini Khadse vs Rupali Chakankar
Sanjay Raut : अजित पवार बारामतीतून पराभूत होतील, लाडक्या बहिणीच त्याचा पराभव करतील; संजय राऊत कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com