Police Bharti 2022: राज्यात नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली

नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे.
Police Bharti 2022
Police Bharti 2022saam tv

सुशांत सावंत

Police recruitment Update : राज्यातील पोलीस भरतीबदद्ल महत्वाचे अपडेट समोर आलं आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले होते. पोलीस भरतीसाठी अनेक तरुण-तरुणींनी तयारी केली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस (Police) भरती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Police Bharti 2022
Eknath Shinde : भर कार्यक्रमातूनच CM शिंदेंनी फिरवला फोन, तात्काळ ८ कोटी मंजूर, नंदुरबारमध्ये नेमकं काय घडलं?

राज्यात नोव्हेंबर महिन्यात होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य राखीव दलाची ही पोलीस भरती पुढे ढकलली आहे. पोलीस (Police) शिपाई संवर्गातील ही भरती प्रशासकीय कारणात्सव पुढे ढकलण्यात आली आहे. या भरतीची पुढच्या आठवड्यात नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून ही भरती पुढे ढकलली आहे. मागील तीन वर्षांपासून भरती झाली नव्हती. तसचे काही जणांना वयोमर्यादेमुळे भरती प्रक्रियेला मुकावे लागू नये म्हणून भरती प्रक्रिया पुढे ढकलली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Police Bharti 2022
'दाऊदसारख्या कित्येकांना...'; नेत्यांची सुरक्षा काढण्यावरून भुजबळांचा शिंदे सरकारला इशारा

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणात्सव स्थगित करण्यात येत आहे. सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com